पुणे -पुणेकरांसाठी गुरुवारी सायंकाळी एक निर्णय आला अणि सारेजण बुचकळ्यात पडले .पुणेकरांसाठी एक महत्त्वाची घोषणा गुरुवारी जिल्हाधिकाऱ्यांकडून (Pune Collector) करण्यात आली. आणि तो निर्णय होता हेल्मेट सक्तीचा (Helmet Mandatory). जिल्हाधिकारी राजेश देशमुख (Rajesh Deshmukh) यांनी एक आदेश काढत पुण्यात तुम्ही आता जर दुचाकी चालवत असाल तर आता हेल्मेट वापरणे सक्ती असेल असे सांगितले.
पुणेकरांचा विरोध - पुणेकरांसाठी हेल्मेटसक्ती काही नवीन नाही. या आधीसुद्धा अनेक वेळा हा निर्णय झाला खरा पण तो नेहमी वादातच सापडला. या आधी ज्या वेळेस हा हेल्मेट सक्तीचा निर्णय घेतला त्या वेळेस पुणेकरांनी मोठ्या प्रमाणात विरोध देखील केलेला पाहायला मिळाले. यावेळी देखील पुणेकर या निर्णयाचा विरोध करताना दिसत आहेत, तर अनेक पुणेकर या निर्णयाचे समर्थन देखील करताना दिसत आहेत.
ई टीव्ही भारतने घेतलेला आढावा जर आम्ही शहरात गाडी स्पीडने चालवत नाहीत तर मग आम्हाला हेल्मेट सक्ती का? असा सवाल करत पुणेकर मात्र मोठ्या प्रमाणात नाराज झाले आहेत. तर हा अट्टाहास नेमका कशासाठी? असा सवाल काही सामाजिक संस्थांनी केला आहे.
हेल्मेट सक्ती नाही - जिल्हा प्रशासनाच्या हेल्मेट सक्तीच्या निर्णयामुळे पुणेकर नाराज झाले आणि त्यानंतर मात्र जिल्हाधिकारी देशमुख यांनी जिल्ह्यात तूर्तास हेल्मेट सक्ती नसल्याचे स्पष्टीकण दिले आहे.
आधी निर्णय, मग माघार जिल्हाधिकारी म्हणतात -जिल्हाधिकारी देशमुख यांनी घेतलेल्या या निर्णयाला पुणेकरांनी विरोध केला. त्यानंतर राजेश देशमुख यांनी पुण्यात हेल्मेट सक्ती नसेल असे स्पष्ट केले. सर्वसामान्यांना हेल्मेट घालणे बंधनकारक नसेल तर त्यांचे प्रबोधन केले जाईल, असे राजेश देशमुख यांनी सांगितले आहे. पहिल्या टप्प्यात शासकीय कर्मचाऱ्यांनी कामावर येताना हेल्मेट वापरावे यासाठी त्यांना सूचना करण्यात आल्या. शासकीय कर्मचाऱयांचे प्रबोधन झाल्यानंतर सर्वसामान्य नागरिकांचे प्रबोधन केले जाईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
जिल्हाधिकाऱ्यांकडून पुण्यात हेल्मेटच्या वापराबाबत जे आदेश काढण्यात आले होते त्यामुळे सर्वसामान्यांना हेल्मेट सक्ती केल्याचा समज निर्माण झाला होता. मात्र, जिल्हाधिकाऱ्यांकडून आता हेल्मेट सक्ती नसेल हे स्पष्ट करण्यात आले आहे.