महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

कोंढवा अन् आंबेगाव सीमा भिंत दुर्घटना बांधकाम व्यावसायिकांच्या बेजबाबदारपणामुळे, सीओईपीच्या अहवालात स्पष्ट

कोंढवा आणि आंबेगाव सीमा भिंत दुर्घटना बांधकाम व्यावसायिकांच्या बेजबाबदारपणामुळे घडल्याचे पुण्यातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या अहवालात म्हटले आहे.

भिंत पडल्याचे दृश्य

By

Published : Jul 9, 2019, 5:21 PM IST

पुणे -कोंढवा आणि आंबेगाव सीमा भिंत दुर्घटना प्रकरणात बांधकाम व्यावसायिक दोषी असल्याचा ठपका पुण्यातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या (सीओईपी) अहवालात ठेवण्यात आला आहे. या दोन्ही घटना बांधकाम व्यावसायिकांच्या बेजबाबदारपणामुळे घडल्याचे या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच बांधकामाचा दर्जा निकृष्ट आणि रचनेत दोष असल्याचेही यात स्पष्ट करण्यात आले आहे. शिवाय सीमा भिंतीचा उर्वरित भाग तातडीने उतरविण्याची गरज असल्याचे अहवालात सांगण्यात आले आहे.

भिंत दुर्घटना

पुणे महापालिकेच्या बांधकाम खात्याला हा अहवाल सादर करण्यात आला. २९ जूनला पुण्यातील कोंढवा परिसरात असलेल्या एका इमारतीची सीमा भिंत कोसळून त्याखाली बांधकाम कामगार मजूर सापडले होते. यात 15 कामगारांचा मृत्यू झाला होता, तर २ जुलैला पुण्यातल्या आंबेगाव परिसरातील सिंहगड २०२ लगतच्या सीमा जवळ असलेल्या मजुरांच्या झोपड्यांवर भिंत कोसळून ६ जण ठार झाले होते. या प्रकरणात सीओईपीकडून सविस्तर अहवाल मागवण्यात आला होता. त्यानुसार सीओईओपीने हा अहवाल सादर केला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details