पुणे- करिअर मार्गदर्शन करणाऱ्या एका कोचिंग क्लासच्या शिक्षकाने एका 18 वर्षीय विद्यार्थिनीला मित्राच्या फ्लॅटवर घेऊन जात तिच्यासोबत बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. कोंढव्यातील एका सोसायटीत दहा जुलै रोजी ही घटना घडली. मोसिन शेख (वय 32) असे आरोपी शिक्षकाचे नाव आहे. कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये संबंधित शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणीने नुकतीच बारावीची परीक्षा दिली आहे. तिचा निकाल येणे अद्याप बाकी आहे. मोसिन शेख हा ऑक्टोबर 2019 मध्ये पीडित तरुणीच्या विद्यालयात करिअर गाईडलाईन्स यावर लेक्चर देण्यासाठी गेला होता. तेव्हा त्याची पीडित तरुणीसोबत ओळख झाली होती. तेव्हा त्याने महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना स्वतःचा मोबाईल नंबर दिला होता. पीडित तरुणीला मर्चंट नेव्हीचा कोर्स करायचा होता. यासाठी तिने चार जुलै रोजी मोसिन शेख यांच्याशी फोनवर संपर्क साधला. तेव्हा त्याने या तरुणीला कौसर बागेतील क्लासमध्ये येण्यास सांगितले.