महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

CM Eknath Shinde Review meeting : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या आढावा बैठकीला आमदार, खासदार आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनाच एंट्री - CM Eknath Shinde Review meeting

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पुणे दौऱ्यावर ( CM Eknath Shinde in Pune ) आहेत. त्यांच्या अध्यक्षतेखाली विधान भवन येथे पाऊस, अतिवृष्टी, पीक पाणी व विकास कामे राज्यातील घडामोडींबाबत आढावा बैठक आयोजित करण्यात आली ( Review meeting on state affairs ) आहे. या बैठकीला ज्या लोक्रतिनिधींना निमंत्रण आहे. अशाच लोकांना आतमध्ये सोडण्यात येत आहे.

CM Eknath Shinde Review meeting
एकनाथ शिंदेंची आढावा बैठक

By

Published : Aug 2, 2022, 12:44 PM IST

पुणे - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पुणे दौऱ्यावर ( CM Eknath Shinde in Pune ) आहेत. शहरात मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीमध्ये अनेक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली विधान भवन येथे पाऊस, अतिवृष्टी, पीक पाणी व विकास कामे राज्यातील घडामोडींबाबत आढावा बैठक आयोजित करण्यात आली ( Review meeting on state affairs ) आहे. या बैठकीला ज्या लोक्रतिनिधींना निमंत्रण आहे. अशाच लोकांना आतमध्ये सोडण्यात येत आहे. विधान भवन बाहेर पोलिसांच्यावतीने येणाऱ्या प्रत्येक जणाची चौकशी करण्यात येत आहे.

महत्त्वाच्या व्यक्तींनाच प्रवेश -विधानभवन येथे होणाऱ्या बैठकीला खासदार आमदार आणि प्रशासकीय अधिकारी यांनाच आतमध्ये सोडण्यात येत आहे. आजच्या या बैठकीत जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी प्रशासकीय अधिकारी हजर राहणार आहे. आजच्या या बैठकीत विधान परिषद आमदार उपसभापती नीलम गोरे ( Vidhan Parishad MLA Deputy Speaker Neelam Gore ) बैठकीला उपस्थित राहणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

उद्यानाचा उद्घाटन कार्यक्रम रद्द -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज हडपसर येथे त्यांच्या नाव्याने उभारण्यात आलेल्या उद्यानाचे उद्घाटन ( Inaugurate of Park ) होणार होते. अनेक सामाजिक संस्थांनी विरोध केल्याने आज होणारा उद्घाटन कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे.महापालिकेच्या मुख्य सभेने केलेल्या ठरावाला केराची टोपली दाखवित शिंदे समर्थक माजी नगरसेवक नाना भानगिरे ( Former corporator Nana Bhangire ) यांनी हडपसर परिसरातील ( Hadapsar Area ) या उद्यानाला एकनाथ शिंदे उद्यान असे नाव दिले आहे. त्यामुळे उद्यानाचे उद्घाटन वादग्रस्त ठरण्याची शक्यता होती. शहरातील स्वयंसेवी संस्थांनीही त्याला तीव्र विरोध दर्शविला होता. त्यामुळे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणाऱ्या उद्यानाचे उद्घाटन रद्द करण्यात आले आहे.

राज्यपालांची सदिच्छा भेट -महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांची मुंबईतील आरएसएस कार्यालयात भेट घेतली. मागील काही दिवसांपासून राजकीय वातावरण वातावरण ढवळून निघाले आहे. तसेच, महिना झाला तरी शिंदे- फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार? असा प्रश्न सातत्याने विचारला जात आहे. न्यायालयाकडूनही शिंदे गटाच्या याचिकेवर निर्णय आलेला नाही. तसेच, राज्यातील वातावरण बिघडले आहे, यासंदर्भामध्ये सुद्धा या भेटीत चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे.

हेही वाचा -Har Ghar Tiranga : राष्ट्रध्वजाची निर्मिती करणारे पिंगाली वेंकय्या यांचा आज जन्मदिन, जाणून घ्या, त्यांचे योगदान

ABOUT THE AUTHOR

...view details