पुणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ताफा शुक्रवारी चांदणी चौकात अडविण्यात आला होता. संतप्त पुणेकरांनी तुमच्या ताफ्यामुळेच वाहतूक कोंडी झाल्याचा आरोप केला होता. या प्रकारामुळे दोन तास मोठी वाहतूक कोंडी झाली होती. हा प्रकार चांदणी चौकात नवा नसून गेली कित्येक वर्षे वाहतूक कोंडी होत असते, त्यातच पुलांची बांधकामे रखडल्याने यात गेल्या दोन वर्षांपासून भर पडली आहे. सातारा येथून मुंबईकडे येताना आज एकनाथ शिंदे सातारा दौरा आटोपून मुंबईकडे निघणार आहेत. दुपारी दोन वाजता ते चांदणी चौकात येऊन तिथे चाललेल्या कामाची पाहणी करणार आहेत. तसेच अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत.
CM Eknath Shinde मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा पुण्यातील चांदणी चौकात येणार
सातारा येथून मुंबईकडे येताना आज एकनाथ शिंदे सातारा दौरा आटोपून मुंबईकडे निघणार आहेत. दुपारी दोन वाजता ते चांदणी चौकात येऊन तिथे चाललेल्या कामाची पाहणी करणार आहेत. तसेच अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना साताऱ्याकडे जाताना पुण्यातील चांदणी चौक भागांमध्ये वाहतूक कोंडीमध्ये अडकावं लागलं होतं. त्यानंतर मुख्यमंत्र्याने अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेऊन त्यांना या कामासंबंधी माहिती घेऊन काम मार्गी लावण्याचे आदेश दिले होते. त्याचबरोबर स्वतः उच्चतंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील हे सुद्धा काल पुण्यामध्ये होते .त्यांच्याच मतदारसंघात हा भाग येतो आणि त्याने सुद्धा सगळे अधिकाऱ्यांची बैठक घेऊन या कामाबाबतचे आदेश दिले होते . चांदणी चौकामध्ये पाडण्याचे आदेश आता राज्य शासनाच्या देण्यात आलेले आहेत .12ते 17 सप्टेंबर दरम्यान हा ब्रिज पाडण्यात येणार आहे त्यामुळे रस्त्याची रुंदी वाढून वाहतूक कोंडी कमी होईल अस पाहणीत आढळून आले आहे
पुणे मुंबई मार्गावर चांदणी चौक हा ब्रिज आहे या ब्रिजवरूनच कोथरूड भागातून शहरातून येणारी आणि शहरात जाणारी या दोन्ही ठिकाणाची वाहतूक आहे त्यामुळे या ठिकाणी पुणेकरांना गेल्या एक वर्षापासून प्रचंड अशा ट्रॅफिकला सामोरे जावे लागत आहे. परंतु अधिकारी आणि कॉन्ट्रॅक्टर यांच्या कामाची सगती याला जबाबदार असल्याचे पुणेकर म्हणत आहेत.
मंत्री एकनाथ शिंदे यांनी आदेश दिल्यानंतर आता या कामाला गती आलेले आहे. 12ते 17सप्टेंबर दरम्यान जो जुना ब्रिज आहे तो पाण्यात येणार आहे त्याचबरोबर मोठा रुंदीचा रस्ता बनवण्याचे आदेश अधिकाऱ्याने दिलेले असून आज स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दुपारी 2.30 दरम्यान या कामाची पाहणी करणार आहेत.
काल चांदणी चौक भागाची पुण्यातील सगळ्या वरिष्ठ अधिकाऱ्याने पाहणी केली. त्याचबरोबर स्वतः उच्चतंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील याने पुण्याच्या आयुक्तांची ट्रॅफिक बाबत चर्चा केलेली होती. तसेच अधिकाऱ्यांची बैठक केलेली होती त्यामुळे या कामाला आता गती येईल अशी पुणेकरांना अपेक्षा आहे. कारण आज सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा त्या ठिकाणी परत जाताना कामाची पाहणी करणार आहेत.
TAGGED:
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुणे