पुणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दरवर्षीप्रमाणे या वर्षीदेखील भीमाशंकर येथील ज्योतिर्लिंगाचे कुटुंबासह दर्शन CM Eknath Shinde Visited Bhimashankar घेऊन विधिवत पूजा, अभिषेक घातला आहे. महाराष्ट्रातील कष्टकरी, शेतकऱ्यांना Farmers of Maharashtra सुगीचे दिवस येऊ दे, महाराष्ट्रावर कुठलेही संकट येऊ देऊ नकोस असे साकडे मुख्यमंत्र्यांनी शंकराला घातले आहे. मुंबईवर हल्ला करण्याची कोणीही हिंमत करणार नाही. कारण मुंबई पोलीस आणि गृहविभाग सक्षम Mumbai Police and Home Department are Capable आहे, असेदेखील यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. शुक्रवारी रात्री त्यांनी कुटुंबासह भीमाशंकर येथे दाखल झाले होते.
मुख्यमंत्र्यांचे कुटुंबासह भीमाशंकराचे दर्शन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, दरवर्षीप्रमाणे आम्ही कुटुंब भीमाशंकर येथे दर्शनासाठी आलो आहोत. भक्तिभावाने पूजा केली आहे. भगवान शंकराकडे काही मागावे लागत नाही. त्याला सर्व माहिती असते, काय घ्यायचे आणि काय द्यायचे. भीमाशंकराकडे एवढेच मागणं मागितलं की राज्यातील बळीराजा, शेतकरी, कष्टकरी, सर्व समाज, कामगार हे सुखी राहोत आणि त्यांना सुगीचे दिवस येवोत. महाराष्ट्र राज्य सुजलाम् सुफलाम् होवो. राज्यावरील संकट दूर होऊ दे, असे साकडं घातले आहे.