महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

CM Eknath Shinde : ...अन् मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मारली जोरदार किक; पाहा व्हिडिओ - CM Eknath Shinde

माजी नगरसेवक प्रमोद नाना भानगिरे यांच्या प्रभागात उभारण्यात आलेल्या हिंदुहृदयसम्राट बाबासाहेब ठाकरे फुटबॉल मैदान ( Hinduhridaysamrat Balasaheb Thackeray football ground ) आणि धर्मवीर आनंद दिघे उद्यानाचा ( Dharamveer Anand Dighe Udyan pune ) उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात ( CM Eknath Shinde on visit to Pune ) आले. यावेळी उद्घाटन झाल्यावर हिंदुहृदयसम्राट बाबासाहेब ठाकरे फुटबॉल मैदानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फुटबॉल खेळण्याचा आनंद लुटला.

CM Eknath Shinde
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे फुटबॉल खेळताना

By

Published : Aug 2, 2022, 10:38 PM IST

Updated : Aug 2, 2022, 10:55 PM IST

पुणे - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पुणे दौऱ्यावर ( CM Eknath Shinde on visit to Pune ) आहेत. पुण्यात शहरात विविध कार्यक्रमांना एकनाथ शिंदे यांनी आज हजेरी लावली. माजी नगरसेवक प्रमोद नाना भानगिरे यांच्या प्रभागात उभारण्यात आलेल्या हिंदुहृदयसम्राट बाबासाहेब ठाकरे फुटबॉल मैदान ( Hinduhridaysamrat Balasaheb Thackeray football ground ) आणि धर्मवीर आनंद दिघे उद्यानाचा ( Dharamveer Anand Dighe Udyan pune ) उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उद्घाटन झाल्यावर हिंदुहृदयसम्राट बाबासाहेब ठाकरे फुटबॉल मैदानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फुटबॉल खेळण्याचा आनंद लुटला. यावेळी या कार्यक्रमाला माजी मंत्री आमदार उदय सामंत, आमदार तानाजी सावंत, माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे फुटबॉल खेळताना

तर लोकांनी आमच्याकडे पाठ फिरवली असती - यावेळी उद्घाटनाच्या कार्यक्रमावेळी शिंदे म्हणाले की, आज जे आमच्यावर गद्दार तसेच बंडखोर अश्या उपमा देत आहे. त्यांना राज्यातील जनता उत्तर देत आहे. आम्ही जिथे जात आहोत तिथे आमचा स्वागत केले जात आहे. जर आम्ही चुकीची भूमिका स्वीकारली असती तर लोकांनी आमच्याकडे पाठ फिरवली असती. पण असे न होता. आम्ही जिथे जात आहो तिथे लोक आमचा स्वागत करत आहे, असे यावेळी शिंदे म्हणाले.

हेही वाचा -Eknath Shinde : निवडून येण्यासाठी मला निवडणूक चिन्हाची गरज नाही; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर बाण

भूमिकेत बाळासाहेब ठाकरे यांचा विचार- आम्ही बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची भूमिका घेतली आणि राज्यातील विविध ठिकाणी इतर जी प्रलंबित कामे आहेत त्यांचा आढावा घेत उद्घाटन करत आहे. आम्ही जी भूमिका घेतली आहे त्यात बाळासाहेब ठाकरे यांचा विचार आहे. राज्यात शिवसेना युतीचे सरकार स्थापन झाले आहे. मी आणि उपमुख्यमंत्री आम्ही दोघे जण अतिवृष्टी पूर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी गेलो होतो. शेतकऱ्यांना राज्य सरकारच्यावतीने मदत दिली जाणार आहे. तश्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत. आज राज्य सरकारच्या मागे केंद्र सरकार आहे. म्हणून राज्याच्या विकासासाठी भविष्यात आम्ही काम करणार आहे. असे देखील यावेळी शिंदे म्हणाले.

फुटबॉल खेळताना घेतला आनंद

मी मुख्यमंत्री झालो हे कोणालाच हजम होत नाहीये.मी विधानसभेत म्हटलो होतो, सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो नाही. आज सर्वसामान्य नागरिक देखील राज्याचा मुख्यमंत्री होऊ शकतो. हे जनेतेने दाखवून दिले आहे. हे सरकार गोरगरीब कष्टकरी शेतकऱ्यांचे सरकार आहे. सर्वसामान्य नागरिकांसाठी जे करता येईल ते आम्ही करणार आहे. आम्ही ऐतिहासिक भूमिका घेतली आणि आमची चर्चा देशभर होत आहे. याची दखल जगभराने घेतली आहे. आज घराघरातील लहान मुलांना माहीत झाल आहे की एकनाथ शिंदे कोण आहे. आज महाराष्ट्र मॉडेलच इतर ठिकाणी देखील अनुकरण झाला तर नवल वाटू देऊ नका. ब्रिटन लंडन या ठिकाणी देखील आपला मॉडेल लोक चालवत आहे. आमचा वयक्तिक अजेंडा काहीही नाही. आम्ही लोकांसाठी काम करत आहोत, असे देखील यावेळी शिंदे म्हणाले.

हेही वाचा -Taiwan : अमेरिकन संसदेच्या सभापती पोहोचल्या तैवानमध्ये.. चीन म्हणतो, 'गंभीर परिणामाला तयार राहा'

नाना भानगिरे यांनी जो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाने उद्यान तयार केले होत, त्याबाबत शिंदे म्हणाले की, माझ्या प्रेमापोटी माझे नाव नाना याने दिले मला खूप काम करायचे आहे. एवढ्या लवकर मला जायचे नाही. म्हणून आता या उद्यानाच नाव हे धर्मवीर आनंद दिघे देण्यात आले आहे, असे देखील यावेळी शिंदे म्हणाले.

हेही वाचा -Desai Comment On Raut: संजय राऊतांनी आपल्या चुकांचे खापर राजकीय पक्षावर फोडू नये -शंभूराज देसाई

Last Updated : Aug 2, 2022, 10:55 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details