महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

CM Pune Visit :...तर जनहिताची कामे थांबणार नाहीत - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुणे बैठक

जनतेच्या कामांसाठी क्रियान्वयनातील टप्पे कमी करून विकासकामे वेगाने पूर्ण करावी. विकासकामांसाठी प्रशासनाला शासनाचे सर्वतोपरी सहकार्य राहील, असे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Chief Minister Eknath Shinde ) यांनी सांगितले आहे. आज ( मंगळवारी ) पुणे विभागीय आयुक्त ( CM meeting Pune Divisional Commissioner ) कार्यालयात पाऊस, अतिवृष्टी, पीक पाहणी आणि विकासकामांबाबत आयोजित आढावा बैठकीत शिंदे बोलत होते.

CM Pune Visit
CM Pune Visit

By

Published : Aug 2, 2022, 4:12 PM IST

पुणे -पुणे विभागातील जनहिताच्या विकासकामांसाठी कोणत्याही प्रकारे निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही. जनतेच्या कामांसाठी क्रियान्वयनातील टप्पे कमी करून विकासकामे वेगाने पूर्ण करावी. विकासकामांसाठी प्रशासनाला शासनाचे सर्वतोपरी सहकार्य राहील, असे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे. आज ( मंगळवारी ) पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात पाऊस, अतिवृष्टी, पीक पाहणी आणि विकासकामांबाबत आयोजित आढावा ( CM meeting Pune Divisional Commissioner ) बैठकीत शिंदे बोलत होते. पूरग्रस्त भागातील नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम त्वरित पूर्ण करावे. शासनाच्या मदतीपासून कुणीही वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी. दरड प्रवण गावातील तात्पुरते स्थलांतर केलेल्या नागरिकांना सर्व प्रकारच्या मूलभूत सुविधा देण्यात याव्यात, असे यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Chief Minister Eknath Shinde ) यांनी सांगितले.


'पीक कर्जवाटपाचे उद्दिष्ट पूर्ण करा' :मुख्यमंत्र्यांनी विभागातील पेरणी, पीक कर्जवाटप, बी-बियाणे आणि खतांची उपलब्धता याचाही आढावा घेतला. कृषि निविष्ठांची कमतरता भासू देऊ नये आणि निकृष्ठ बियाण्यांच्या बाबतीत विशेष लक्ष ठेवावे. पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण होईल, याकडेही लक्ष द्यावे. पीक विमा योजनेचा लाभ शेतकऱ्यांना वेळेवर मिळावा यासाठी विमा कंपन्यांना सूचना देण्यात याव्या. पीक कर्ज वाटपाचे प्रमाण वाढविण्यासाठी जिल्हा आणि विभाग स्तरावर बैठका घेण्यात याव्यात, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.



'कोविड वर्धक मात्रेबाबत जनप्रबोधन करा' :मुख्यमंत्र्यांनी विभागातील कोविड परिस्थितीचा आढावा घेतला. कोविडची वर्धित मात्रा घेण्यासाठी नागरिकांच्या प्रबोधनावर भर द्यावा आणि व्यापक प्रमाणात सर्व माध्यमांद्वारे जनजागृती करण्यात यावी. येणाऱ्या सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शाळा, महाविद्यालयात लसीकरण शिबिरांचे आयोजित करावे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ७५ दिवस लसीकरण कार्यक्रमांतर्गत लसीकरणाचे प्रमाण वाढवावे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधून लसीकरणासाठी विशेष मोहीम राबवावी. पावसाळ्यातील आजार, डेंग्यू, मंकीपॉक्स आदी आजाराबाबत दक्षता घ्यावी, असे निर्देश शिंदे यांनी दिले.


'वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी योग्य नियोजन करा' :बैठकीत विभागातील विकासकामांचा आढावा घेण्यात आला. पुणे रिंगरोडसाठी आवश्यक भूसंपादनाच्या कामाला गती द्यावी. भूसंपादततील वादाचे मुद्दे लोकअदालतीच्या माध्यमातून सामोपचाराने सोडवावे. वाहतुकीचे नियोजन करताना रिंगरोडला जोडणाऱ्या मिसिंग लिंकचा समावेश करावा. पुणे शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी आवश्यक नियोजन करावे. रस्त्यावरील खड्डे भरताना तात्पुरते काम न करता नव्या तंत्रज्ञानाचा वापर करावा. पुणे महानगर विकास प्राधिकरण क्षेत्रातील एकात्मिक वाहतूक आराखड्याबाबत एकत्रित बैठक मुंबई येथे आयोजित करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.


'केंद्र पुरस्कृत योजनांना गती द्या' :प्रधानमंत्री आवास योजनेचे उद्दिष्ट १०० टक्के पूर्ण करावे. राज्य आणि केंद्रशासनाच्या योजनांचा आढावा विभागीय आयुक्त स्तरावर घेण्यात यावा. राज्यातील विविध योजनांसाठी केंद्र सरकार निधी देण्यास तयार आहे. केंद्र सरकारकडे प्रलंबित बाबी मार्गी लागण्यासाठी राज्य शासन आवश्यक पाठपुरावा करेल. अशा विकास योजनांच्या कामाला गती देण्यात यावी.


'धार्मिकस्थळांच्या ठिकाणी भाविकांना आवश्यक सुविधा द्या' :मुख्यमंत्री शिंदे यांनी पर्यटन आणि धार्मिक स्थळ विकासकामांचा आढावा घेतला. पंढरपूरचा विशेष विकास आराखडा तयार करावा. रस्ते, पदपथ, स्वच्छतागृह, स्नानगृह अशा सर्व उत्तम सुविधांचा त्यात समावेश करण्यात यावा. भीमाशंकर येथील विकासकामे उत्तम दर्जाची करावीत. विभागातील सर्व धार्मिक स्थळाच्या ठिकाणी भाविकांना अडचण येणार नाही असेच विकासाचे नियोजन व्हावे. पुणे विभागातील सर्व तीर्थस्थळांच्या विकासाबाबत एकत्रित सादरीकरण करण्यात यावे. सातारा जिल्ह्यातील कास पठार पर्यटन विकास, मेढा-केळघर येथील पुलाचे काम, प्रतापगड परिसर विकास, शिखर-शिंगणापूर विकास आदींबाबत यावेळी आढावा घेण्यात आला. गणेशोत्सव उत्साहाने साजरा होईल यादृष्टीने प्रशासनाने गणेश मंडळांशी समन्वयाने नियोजन करावे. सण-उत्सवाच्या कालावधीत कायदा व सुव्यवस्था राखली जाईल आणि शांततेत सर्व उत्सव पार पडतील याविषयी दक्षता घ्यावी, अशाही सूना मुख्यमंत्री शिंदे यांनी दिल्या.



'हर घर तिरंगा' कार्यक्रम यशस्वी करा' :स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित 'हर घर तिरंगा' कार्यक्रम घराघरात पोहचविण्यासाठी सर्व यंत्रणेचा सहभाग घ्यावा. स्वयंसेवी संस्था, लोकप्रतिनिधी यांचा सहभाग घेत 'हर घर तिरंगा' कार्यक्रम यशस्वी करावा. घरावर तिरंगा फडकविण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहित करावे, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. विभागीय आयुक्त राव यांनी बैठकीत पुणे विभागातील विविध विषयांबाबत सादरीकरण केले. विभागात ३१ जुलैपर्यंत सरासरीच्या ८१ टक्के पाऊस झाला आहे. विभागातील मोठ्या प्रकल्पात ७१ टक्के, मध्यम प्रकल्पात ६५ आणि लघू प्रकल्पात ४६ टक्के पाणीसाठा झाला आहे. ४४ तालुक्यातील १५० महसूली मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. नैसर्गिक आपत्तीत मृत पावलेल्या ७ व्यक्तींच्या वारसांना २८ लाख रुपयांची मदत वितरीत करण्यात आली आहे. २ हजार ३१७ हेक्टर क्षेत्रात शेतीपिकांचे नुकसान झाले आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.



कोरोनामुक्त गाव स्पर्धेतील यशस्वी गावांना पुरस्कार :राज्य शासनाने सुरू केलेल्या कोरोनामुक्त गाव स्पर्धा योजनेंअंतर्गत माण, ता. मुळशी आणि सपकळवाडी, ता. इंदापूर या ग्रामपंचायतींनी कोविड व्यवस्थापनामध्ये केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल या गावांना मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते कोरोना मुक्त गाव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कोरोनामुक्तीसाठी कुटुंब सर्वेक्षण पथक, विलगीकरण कक्ष, कोरोना तपासणी, कोव्हीड हेल्पलाईन पथक आदींच्या माध्यमातून या गावांनी उत्कृष्ट काम केले आहे.

हेही वाचा -Ajit Pawar : मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला अजित पवार आणि नीलम गोऱ्हे अनुपस्थित; राजकीय चर्चेला उधाण

ABOUT THE AUTHOR

...view details