पुणे -पुणे मंडळ म्हाडाच्या ५२११ घरांच्या ऑनलाईन सोडतीचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे आज गुरुवारी शुभारंभ करण्यात आला. पुणे विभागाच्या Pune Division म्हाडाच्या घरांची सोडत Allotment of Mhada houses आज पुण्यात पार पडली. पुणे जिल्ह्यातील म्हाडाच्या 5 हजार 211 घरासाठींची सोडत जिल्हा परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Chief Minister Eknath Shinde आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Deputy Chief Minister Devendra Fadnavis यांच्या ऑनलाईन उपस्थित पार पडली आहे. 5 हजार 211 घरासाठी म्हाडाकडे सुमारे 71 हजार 772 अर्ज आले होते. त्यानुसार या घरांची सोडत अतिशय पारदर्शक रित्या पार पडल्याची माहिती म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी यावेळी दिली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ऑनलाईन पद्धतीने उपस्थितांशी संवाद देखील साधला आहे. आपले सरकार हे सर्वसामान्यांना न्याय देणार असून सरकार हे सर्वसामान्यांचा मनातल सरकार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. त्यासोबतच 5211 लोकांना आज घरे मिळणार आहेत ही बाब खरच मोठी असून आपल्या म्हाडाच्या घरांसाठी एवढे अर्ज आल्याने जनतेचा शासनावर किती विश्वास आहे हे सिद्ध झाले असल्याचे देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले आहे. या सोडतीची संपूर्ण यादी अर्जदारांना आज सायंकाळी 6 वाजता म्हाडाच्या अधिकृत वेबसाईटवर पाहता येणार असून ज्यांना घरी लागली आहेत. त्यांना अधिकृत मेल पाठवण्यात येणार असल्याची माहिती देखील अधिकाऱ्यांनी दिली आहे.