पुणे -निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी अगदी मेटाकुटीला आला आहे. सकाळी दाट धुके, कडाक्याची थंडी, दिवसा ऊन-पाऊस असे वातावरण होत असल्याने, रब्बी हंगामातील कांद्यावर विविध रोगांचा प्रादुर्भाव होत आहे. यामुळे कांदा उत्पादक शेतकरी सध्या चिंत्तेत आहे. या परिस्थितीत आलेल्या संकटावर मात करण्यासाठी शेतकऱ्यांनी काय उपाययोजना केल्या पाहिजेत, याबाबत ईटीव्ही भारतने कृषी तज्ज्ञांशी चर्चा केली आहे.
हेही वाचा... 'यापुढे ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधीवर अभिषेक नाही,' विश्वस्त समितीच्या निर्णयाला पुजाऱ्यांचा विरोध
वातावरणातील लहरीपणाचा सर्वाधिक फटका, हा कांदा पिकाला बसत आहे. सध्या कांद्याला चांगला बाजारभाव मिळत असल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात खर्च करून कांद्याची लागवड केली. परंतु हाच कांदा निसर्गाच्या लहरीपणामुळे मोठ्या संकटात सापडला आहे. कांद्यासोबत रब्बी हंगामातील गहू, हरभरा, ज्वारी यांसारख्या पिकांवर देखील तांबेरा, मावा, करपा आदी रोगांचा प्रादुर्भाव वाढणार आहे, असे जयसिंग गोडसे या शेतकऱ्याने सांगितले आहे.
हेही वाचा... एल्गार परिषद प्रकरण : पुणे पोलीस 'एफबीआय'ची मदत घेण्याची शक्यता