महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Mangoes Prices : वातावरणीय बदलाचा आंब्याला फटका, आवक वाढल्याने किंमती झाल्या कमी - उष्णतेचा आंब्याला फटका

उष्णता वाढल्याने डझनापैकी एक ते दोन हापूस आतून खराब होत आहेत. तसेच, फळाच्या रंगासह त्याची चवही बदलली आहे. देठाजवळ आंबा काळा पडण्याचे प्रमाणही वाढले आहे.

Mango
Mango

By

Published : Apr 26, 2022, 10:48 PM IST

पुणे: गेल्या काही दिवसांपासून राज्यातील वातावराणात बदल होत आहे. कधी पाऊस तर कधी कडक ऊन पाहायला मिळत आहे. त्यामुळे राज्यात सध्या मोठया प्रमाणात वातावरणीय बदल होत आहे. यावर्षी उन्हाळा अधिक उष्ण ठरत आहे. त्याचा फटका आंब्याला बसला आहे. उष्णता वाढल्याने डझनापैकी एक ते दोन हापूस आतून खराब होत आहेत. तसेच, फळाच्या रंगासह त्याची चवही बदलली आहे. देठाजवळ आंबा काळा पडण्याचे प्रमाणही वाढले आहे.

वातावरणीय बदलाचा आंब्याला फटका
वातावरणीय बदलाचा बसत आहे फटका - राज्यातील सरासरी तापमान चाळीस अंशावर गेल्याने आंब्याला चांगलीच झळ बसत आहे. हंगामाच्या सुरुवातीलाच लहरी वातावरणामुळे कोकणातील हापूस आंब्याचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे, पहिल्या टप्प्यात झाडांवर अवघी 25 टक्केच फळे राहिली. सिझनच्या सुरवातीलाच कमी प्रमाणात आंबा बाजारात आला आणि भाव खावून गेला. पण त्यांनतर परिस्थिती सुधारेल असं चित्र असताना परत उष्णतेचा फटका आणि अधूनमधून पावसाचा देखील फटका आंब्याला बसत आहे.अशी केली जात आहे उपाययोजना - मार्केटमध्ये आंबा दाखल झाल्यानंतर आवश्यकतेपेक्षा जास्त तापमान असल्याने आंबा गरम होऊन कोईपाशी खराब होण्याचे प्रमाण वाढले आहे. साधारण वातावरण असताना आंबा तयार होण्यासाठी ताडपत्रीने झाकून ठेवणे, तसेच भट्टी लावण्यासारखे प्रकार व्यापारी वर्गाकडून करण्यात येतात. मात्र, सध्या वाढलेल्या उष्णतेमुळे आंब्याच्या पेट्यांना फॅनद्वारे हवा देऊन थंड ठेवणे सुरू आहे.आवक वाढल्याने दर झाले कमी - सध्या काही दिवसांपासून उष्णता वाढली असली, तरी पुण्यातील मार्केटयार्डमध्ये मोठ्या प्रमाणात आंब्यांची आवक वाढली आहे. रत्नागिरी आणि देवगड येथील 12 हजारहुन अधिक पेट्यांची आवक वाढल्याने आणि कर्नाटक येथील 6 हजार पेट्यांची आवक वाढल्याने आंब्याचे दर कमी झाले आहे. ज्या आंब्याला मागील महिन्यात पेटीला 5 ते 8 हजार दर होता, त्याच आंब्याच्या पेटीला आत्ता 3 ते 3500 हजार दर आहे. डझनच्या बाबतीत सांगायचं झालं, तर जो आंबा एक महिन्याआधी 800 ते 1500 रुपये डझन मिळत होता, तोच आंबा आत्ता 300 ते 800 रुपये डझन मिळत आहे. अशी माहिती व्यापारी बलराज भोसले यांनी दिली.

आंबा झाला स्वस्त -आंब्यांची आवक सध्या प्रचंड वाढली ( Mangoes arrivals increased ) आहे. गेल्या दीड-दोन महिन्यात आंबे कमी होते. माल कमी येत होता. मात्र गेल्या आठ दिवसांपासून आवक खूप वाढत आहे. मात्र ग्राहक कमी असल्याने दर खूप कमी झाले आहेत. पुणेकरांनी आंबे खाल्ले पाहिजे म्हणजे शेतकऱ्यांचा थोडा फार फायदा होतो, असे आवाहन बलराज भोसले यांनी यावेळी केले आहे.


हेही वाचा -गदाधारीच्या गप्पाही आहेत गधाधारी, देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्र्यांना टोला

ABOUT THE AUTHOR

...view details