पुणे - राज्यभरात गाजलेल्या पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी तत्कालीन वनमंत्री संजय राठोड यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर वेळोवेळी शक्तिप्रदर्शन करत राठोड यांनी पुन्हा मंत्रिपद मिळावी यासाठी प्रयत्न केले. मात्र, त्यात त्यांना यश मिळाले नाही. शनिवारी पोहरादेवीचे सहा संत पुणे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना भेटले आणि त्यांनी संजय राठोड त्यांच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्यांची माहिती घेतली. यावेळी पुणे पोलिसांनी पूजा चव्हाण आत्महत्या आकस्मित घडलेली असल्याचे सांगितले आहे. त्याप्रमाणे पत्रही सदर शिष्टमंडळाला देण्यात आले आहे. त्यामुळे या प्रकरणात संजय राठोड यांना क्लीन चीट मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे.
पुन्हा मंत्रीपद देण्याची मागणी - सदर शिष्टमंडळाने राठोड यांना पुन्हा मंत्रीपद मिळावे या मागणीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे वेळ मागितली आहे. माजी वनमंत्री आणि शिवसेना आमदार संजय राठोड यांच्यावरील आरोपाबाबत पोलिस चौकशी अहवालच्या मागणीसाठी पोहरादेवीचे सहा महंत बाबू सिंह महाराज यांनी परवानगी मागितली आहे. माजी वनमंत्री आणि शिवसेना आमदार संजय राठोड यांच्यावरील आरोपाबाबत पोलिस चौकशी अहवालच्या मागणीसाठी पोहरादेवीचे सहा महंत बाबू सिंह महाराज, कबीरदास महाराज, सुनील महाराज, जीतू महाराज, यशवंत महाराज, शेखर महाराज, आणि ऑल इंडिया बंजारा सेवा संघाचे अध्यक्ष शंकर पवार, अॅड अभय राठोड यांनी शनिवारी पुणे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची पोलिस आयुक्त कार्यालयात भेट घेतली.
पूजा चव्हाणचा आकस्मिक मृत्यू - अॅड अभय राठोड म्हणाले, बंजारा समाजाचे महाराष्ट्रत सुमारे दोन कोटी लोक असून संजय राठोड हे त्यांचे प्रतिनिधित्व करत होते. मात्र, त्यांना आरोप झाल्यानंतर मंत्रीपदावरून पायउतार व्हावे लागले आणि समाजाचे प्रश्न प्रलंबित राहिलेले आहेत. याप्रकरणी नेमके आरोप झालेल्या केसची वस्तुस्थिती काय आहे यासंदर्भात पुणे पोलिस आयुक्त यांची आम्ही भेट घेतली. पोलिसांनी आम्हाला या केसचे समरी पत्रक दिलेले असून त्यात पूजा चव्हाण यांचा मृत्यू आकस्मिक मयत झाल्याचे त्यांनी सांगितले आहे.