पुणे - शिवसेना नेते एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांनी शिवसेनेच्या 37 आमदारांसह बंड पुकारल्यानंतर राज्यातील शिवसैनिक हे आक्रमक झाले असून बंडखोर आमदारांच्या विरोधात राज्यभर आंदोलन होत आहे. पुण्यातही आज शिवसैनिकांच्यावतीने बंडखोर नेते एकनाथ शिंदे ( Rebel leader Eknath Shinde ) यांच्या फोटोला जोडो मारून आंदोलन करण्यात आल आहे. एकनाथ शिंदे हा माणूस गद्दार आहे. आम्ही सर्वजण हे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्यामागे उभे आहोत. असे यावेळी शहराध्यक्ष गजानन थरकुडे यांनी म्हटल आहे. पुण्यात देखील शिवसेनेत फूट पडली असून शिवसैनिक राजाभाऊ भिलारे हे एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी झाले आहे. त्यावर थरकुडे यांना विचारले असता ते म्हणाले की, पुण्यात कुठलीही फूट पडलेली नाही.जो कोणी शिंदे गटात सहभागी झाले आहे त्यामागे किती लोक आहेत. हे देखील पाहावे असे थरकूडे म्हणाले. यावेळी आक्रमक शिवसैनिकांच्या वतीने एकनाथ शिंदे यांच्याविरोधात जोरदार घोषणबाजीही करण्यात आली.
हेही वाचा - शिवसेनेची बंडखोरांबाबत कठोर भूमिका; वाचा, काय म्हणाल्या प्रियंका चतुर्वेदी
दरम्यान, खासदार संजय राऊत यांनी ट्विट करून शिवसेना बंडखोरांवर निशाणा ( Sanjay Raut tweet ) साधला आहे. किती दिवस गुवाहाटीत राहणार आहात, महाराष्ट्रात यावे लागेलच, असे त्यांनी ट्विटमध्ये सूचित केले आहे. ट्विटमध्ये त्यांनी विधानसभेचे उपसभापती नरहरी झिरवाळ ( Narahari Zirwal lateste news ) यांचा ऐटबाज असलेला फोटो टाकत बंडखोरांना डिवचले आहे.