पुणे-मुसळधार पावसाने बुधवारी सायंकाळनंतर शहराला झोडपून काढले आहे. शहराच्या विविध भागात जोरदार पाऊस झाल्याने पाणी साचले आहे. तसेच काही ठिकाणी घरात पाणी शिरले आहे. जोरदार पावसामुळे कात्रज भागातील तसेच कर्वेनगर सुखसागर नगरसह अनेक भागातील वीज पुरवठा खंडित झाला आहे.
शहरात संध्याकाळपासून सुरू झालेला पाऊस रात्री उशिरापर्यंत सुरू राहिला. मुसळधार पावसामुळे शहरातील रस्ते जलमय झाले आहेत. शहरातून जाणाऱ्या नाल्यांना पूर आला आहे. पर्वती, बिबवेवाडी, कात्रज, चंदननगर परिसरात अनेक ठिकाणी सोसायट्यांमध्ये व घरामध्ये पाणी शिरल्याच्या घटना घडल्या आहेत.