पुणे- सातारा जिल्ह्यातील दोन तरुणांना नो-पार्किंग'मध्ये दुचाकी लावल्याचा चार हजारांचा दंड पोलिसांनी ठोठावला. शेवटी तडजोडीने एक हजार रुपये पुण्यातील नारायण पेठेतील कुमठेकर रस्त्यावरील हॉटेलच्या खात्यावर वाहनचालकांना भरायला लावल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
सातारा जिल्ह्यातील दोन तरुण पुण्यात दुचाकीवर कामानिमित्त आले होते. टिळक चौकात दुपारी आल्यानंतर त्यांनी 'नो-पार्किंग'मध्ये दुचाकी लावल्या होत्या. त्यामुळे त्या ठिकाणी असलेल्या वाहतूक पोलिसांनी दुचाकींना जॅमर लावले. त्या दोन तरुणांना दोन्ही गाड्यांचा तीन हजार रुपये दंड भरावा लागेल, असे त्यांनी सांगितले. त्यामुळे दोन तरुणांनी त्याची माहिती तत्काळ पुण्यातील एका नातेवाइकांना दिली. ते तत्काळ त्या ठिकाणी दाखल झाले. त्यांनी दंडाबाबात चौकशी केली. त्या वेळी 'नो पार्किंग'चा दोन हजार व फॅन्सी नंबर प्लेट आणि इतर असा दंड तीन हजार रुपये असल्याचे त्यांना सांगण्यात आले.