महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Panpoi birthday : पुण्यात नागरिकांनी साजरा केला पाणपोईचा वाढदिवस, 25 वर्षांपासून भागवत आहे तहान - पाणपोई बातमी पुणे

घरात पाणी मिळेल, मात्र शहरात फिरताना काय? अशावेळी पाणपोई ही लोकांची तहान भागवते. मात्र, सर्वच पाणपोई सुरू राहतात असे नाही. मात्र, पुण्याच्या मध्यवर्ती भागातील एक पाणपोई अविरतपणे बाराही महिने नागरिकांची तहान भागवत आहे. या पाणपोईचा 25 वा वाढदिवस नागरिकांनी उत्साहात साजरा केला आहे.

Panpoi birthday 25 years Pune
पाणपोई वाढदिवस पुणे

By

Published : May 18, 2022, 8:56 AM IST

पुणे -पाणी म्हणजे सर्वांच्या जीवनाचा अविभाज्य घटक. पाण्याविना कुठलाही जीव जगू शकत नाही. उन्हाळ्यात तर पाण्याची कमतरता ग्रामीण आणि शहरी भागातील नागरिकांना अस्वस्थ करते. या पाण्यासाठी कुठे भटकंती होते तर, कुठे पाण्याची बचत केली जाते. घरात पाणी मिळेल, मात्र शहरात फिरताना काय? अशावेळी पाणपोई ही लोकांची तहान भागवते. मात्र, सर्वच पाणपोई सुरू राहतात असे नाही. मात्र, पुण्याच्या मध्यवर्ती भागातील एक पाणपोई अविरतपणे बाराही महिने नागरिकांची तहान भागवत आहे. या पाणपोईचा 25 वा वाढदिवस नागरिकांनी उत्साहात साजरा केला आहे.

माहिती देताना मंडळाचे अध्यक्ष आणि पदाधिकारी

हेही वाचा -Old man hit by bike : थरारक.. रस्ता ओलांडणाऱ्या वृद्धाला भरधाव मोटरसायकलने उडवले

..अशी सुरू झाली पाणपोई -20 - 25 वर्षांपूर्वी बिस्लेरीची बॉटल तसेच पाण्याचे पाऊच असे काहीच नव्हते. तेव्हा जिथे तिथे शहरातील मध्यवर्ती भागात गणेश मंडळाच्या बाहेर पाणपोई असायच्या. ते ही दोन रांजण, त्यामागे कडब्याच्या पेंढ्या लावलेल्या असायच्या. पुण्यातील अलका चौकाचा राजा समाज विकास मंडळ ट्रस्टच्यावतीने 25 वर्षांपूर्वी अशाच प्रकारे दोन रांजण घेऊन टिळक रोडवर शाळकरी मुले तसेच येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांसाठी पाणपोई सुरू करण्यात आली. सुरवातीला ही पाणपोई उन्हाळ्याच्या 4 महिनेच ठेवण्यात येत होती. पण जस जसा प्रतिसाद मिळत गेला, नागरिक पाणी पिण्यासाठी येऊ लागले त्यानंतर मंडळाच्यावतीने ही पाणपोई वर्षभरासाठी सुरू करण्यात आली. काही वर्षांनंतर ती पक्क्या स्वरुपात बांधण्यात आली.

तहानलेल्या नागरिकांची तहान भागवणारी पाणपोई -सुरुवातीला जेव्हा ही पाणपोई टिळक रोडवर बांधण्यात आली तेव्हा तिला देखील दोन रांजण होत्या, साखळीने बांधलेले ग्लास होते, त्यांच्यावर कडब्याच्या पेंढ्याचा छप्पर असायचा. पण, जस जशी लोकसंख्या वाढत गेली, रहाणीमान बदलत गेले तस तसे या पाणपोईत बदल होत गेले. आठ दहा वर्षांनंतर ही पाणपोई पक्क्या स्वरुपात बांधण्यात आली. त्यांनतर पाण्याची समस्या निर्माण झाली म्हणून परत दोन रांजण आणण्यात आले आणि शेजारी 500 लिटरची टाकी बसविण्यात आली. आज ही पाणपोई वर्षभर सुरू असून येथे येणारे नागरिक, तसेच रिक्षाचालक देखील येथे येऊन पाणी पित आहे.

चक्क लावण्यात आले सीसीटीव्ही -जेव्हा ही पाणपोई बसविण्यात आली होती तेव्हा रांजणला ग्लास बांधून ठेवायचो. पण, तरीही ग्लास चोरी व्हायचे. एकदा तर एक रांजणच चोरीला गेली होती. पण आता मंडळाच्यावतीने सीसीटीव्ही लावण्यात आले आहे, अशी माहिती यावेळी मंडळाचे अध्यक्ष निलेश वैराट यांनी दिली.

लॉकडाऊनमध्ये देखील पोलिसांची भागवली तहान - 25 वर्षांपासून सुरू असलेल्या या पाणपोईच्या अनेक आठवणी आहे. लांब अंतराहून आलेल्या अनेक नागरिकांची तहान या पाणपोईने भागवली आहे. विशेष म्हणजे, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जेव्हा लॉकडाऊन होता तेव्हा याच पाणपोईने अत्यावश्यक सेवा देणाऱ्या पोलीस, महापालिकेचे कर्मचारी, तसेच इतर नागरिकांची तहान भागवली.

हेही वाचा -Raj Thackeray Angry on Reporter : ...अन् राज ठाकरे पत्रकारांवर भडकले, म्हणाले...

ABOUT THE AUTHOR

...view details