पुणे - शिवसेनेचे नेते रघुनाथ कुचिक यांच्यावर बलात्कार करून जबरदस्तीने गर्भपात केल्याप्रकरणी पुण्यातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. 16 फेब्रुवारी रोजी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर, 21 फेब्रुवारीला त्यांना अटकपूर्व जामीन देखील झाला आहे. या सर्व प्रकरणानंतर भारतीय जनता पक्षाच्या नेता चित्रा वाघ आक्रमक झाल्या असून त्यांनी पुणे पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. सर्व पुरावे असताना कुचिक यांना जामीन कसा मिळाला, असा सवाल उपस्थित करत चित्रा वाघ यांनी कुचिक यांनी केलेल्या कृत्याबद्दल त्यांना शिक्षा मिळालीच पाहिजे, असे म्हटले.
हेही वाचा -SPECIAL : मुलाच्या अभ्यासासाठी गच्चीवर फुलवली बाग, 600 हून अधिक फुलपाखरांचा जन्म.. पाहा व्हिडिओ
भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात भाजप नेत्या चित्रा वाघ यांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होत्या.
साहेबांनी या प्रकरणात लक्ष घालावे
भारतीय जनता पक्ष पीडित तरुणीच्या मागे उभी असून या प्रकरणात राज्य सरकारने पुढे यायला हवे. मी आपल्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांना साकडे घालते की, त्यांनी या प्रकरणात लक्ष द्यावे आणि पीडित तरुणीला न्याय मिळवून द्यावे. पीडित तरुणीने साहेबांपर्यंत पोहचण्यासाठी खूप प्रयत्न केले पण तिला साहेबांपर्यंत पोहचू दिले जात नाही. आम्हला विश्वास आहे की जर साहेबांनी या प्रकरणात लक्ष घातले तर, तिला न्याय मिळेल, असे देखील चित्रा वाघ म्हणाल्या.