पुणे - सध्या बाजारपेठेत टोमॅटोला चांगला दर मिळत आहे. महाराष्ट्रातील अनेक शहरात टोमॅटोचे दारांनी उच्चाकी गाठली आहे. पुणे शहरात टोमॅटो हे प्रतिकिलो 80 ते 100 रुपयांवर पोहोचले ( Tomato Price Hike ) आहेत. टोमॅटोच्या वाढत्या दरांमुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. टोमॅटोचे दर वाढल्यामुळे ग्राहकांच्या खिशाला कात्री लागत आहे. तर कांद्यांचे दर हे घरसल्यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू येत आहेत. ( onion price less in market pune )
टोमॅटोचे दर भडकले - उत्पादन घटल्यामुळे बाजारपेठेत यंदा टोमॅटोची आवक कमी आहे. याचा परिणाम म्हणून टोमॅटोच्या दरात मोठी वाढ झाली आहे. दरवर्षी उन्हाळ्यात टोमॅटोच्या दरात वाढ होत असते, पण यंदा झालेली वाढ ही जास्तच झाली आहे. सध्या ज्या शेतकऱ्यांकडे विक्रीसाठी टोमॅटो आहेत. त्या शेतकऱ्यांना याचा चांगलाच फायदा होताना दिसत आहे. पुणे शहरात सध्या टोमॅटोचे दर हे 80 रु किलो आहे. मागच्या आठवड्यात 50 ते 60 रुपये दर होते.उत्पादन घटल्याने बाजारात टोमॅटो कमी प्रमाणात आले आहे. यामुळेच हे दर वाढले आहे आणि यामुळे दरोरोजच्या तुलनेत ग्राहक कमी प्रमाणात टोमॅटो खरेदी करत आहे.
कांदाचे दर गडकडले - कृषी उत्पन्न बाजार समितीत ( APMC ) दोन दिवसात कांद्याचे दर गडगडले आहेत. 55 ते 60 पैसे किलो इतका दर शेतकऱ्यांच्या कांद्याला मिळाला आहे. कांदा सर्वसामान्यांच्या जीवनातील महत्वाचा पदार्थ आहे. शेतकऱ्यांचे नगदी पीक म्हणून शेतकरी कांद्याचे पीक घेतो. गेल्या काही वर्षात कांद्याला चांगले दर मिळत असताना कांदा लागवड 20 हजार हेक्टरने वाढली आहे. नवीन कांदा बाजार पेठेत दाखल झाला आणि कांद्याचे दर गडगडले. किमान दर 1 रुपयांपर्यंत असताना अचानक कांद्याला 55 ते 60 पैसे इतका दर शेतकऱ्यांना मिळाला. त्यामुळे होणार खर्च आणि मिळणार उत्पन्न याचा ताळमेळ बिघडल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. मात्र, निर्यात बंदी उठल्याने कांद्याचे दर वाढतील, अशी अपेक्षा कांदा व्यापारी विशाल पाडसवान व्यक्त केली आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याची आवक वाढल्याने, कांद्याला 75 पैसे ते 5 रुपयांपर्यंत दर मिळत होते. मात्र, अचानक दर घडगडले आणि दर 55 पैसे ते साडेतीन रुपये इतका देण्यात आला. तरी सर्व सामान्यांना बाजारात कांदा 7 ते 10 रुपये किलो या दराने मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनाच दर कमी का, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.
हिरवी मिरची झाली तिखट - पुण्यात टोमॅटो पाठोपाठ आता हिरवी मिरची तिखट होत आहे. उन्हाळ्याच्या झळ्या लागत असताना आता भाजीपाल्याचे दर वाढल्यामुले सर्वसामान्याला आता महागाईच्या झळाही मोठ्या प्रमाणात सोसाव्या लागत आहे. पुण्यात हिरवी मिरचीचे दरही वाढत आहेत. आज पुणे कृषी उत्त्पन्न बाजार समितीत हिरव्या मिरचीला चांगला दर मिळाला असून ती 20 ते 50 रुपये प्रतिकिलो विकली जात आहे.
हेही वाचा - कांद्याला मिळाला 60 पैसे किलोचा दर, बाजारात मिळतोय 8 ते 10 रुपये किलोने