पुणे -शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाल्यानंतर आज पहिल्यांदाच जुन्नर येथील किल्ले शिवनेरीवर जाणार आहेत. या ऐतिहासिक स्थळी राज्यातील शेतकऱ्यांसाठी ठाकरे काही घोषणा करणार का? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या शिवनेरीवर, शेतकरी कर्जमाफीची घोषणा करण्याची शक्यता... हेही वाचा... 'महाराष्ट्र सरकारची 'स्थगिती सरकार' म्हणून गिनीज बुकमध्ये नोंद होईल'
रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराजांनी शिवनेरीवरून रयतेच्या हिताचे अनेक धोरणात्मक निर्णय घेतल्याच्या नोंदी इतिहासात सापडतात. स्वराज्य स्थापन केल्यानंतर रयतेच्या जमिनीचा शेतसाराही शिवाजी महाराजांनी कमी केला होता. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज शिवनेरी गडावर आल्यावर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा करून सातबारा कोरा करणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ असणाऱ्या शिवनेरी गडावरून उद्धव ठाकरे सरसकट शेतकरी कर्जमाफीची घोषणा करू शकतात, असे बोलले जात आहे. मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर उद्धव ठाकरे यांचा हा पहिलाचा दौरा आहे. याशिवाय उद्धव ठाकरे एकवीरा देवीच्या दर्शनालाही जाणार आहेत. 'शिवसेनेचा मुख्यमंत्री झाल्यावर मी स्वत: शिवनेरीवर जाणार, शिवाय कुलदैवत एकवीरेचंही दर्शन घेणार' असल्याचे उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले होते. त्यानुसार उद्धव ठाकरे हा दौरा करणार आहेत.
हेही वाचा... रत्नागिरीत मार्बल अंगावर पडून 2 हमालांचा मृत्यू, 2 गंभीर