महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Cabinet Expansion:...अरे बाबा दोघांच का असेना, चाललयना?; मुख्यमंत्र्यांची मंत्रिमंडळ विस्तारावर प्रतिक्रिया

राज्यात शिंदे सरकार येऊन एक महिना झाला आहे. मात्र, आणखीही मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत तारीख पे तारीख सुरू आहे. ( Chief Minister Eknath Shinde ) दरम्यान, मुख्यमंत्री सध्या पुणे दौऱ्यावर आहेत. त्या दरम्यान, त्यांना पत्रकारांनी त्याना मंत्रिमंडळ विस्ताराबाबत विचारले असता त्यावर मुख्यमंत्री म्हणाले, अरे बाबा दोघांच का असेना सरकार चाललयना, अशी प्रतिक्रिया दिली आहे. त्याची सध्या चर्चा आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

By

Published : Aug 2, 2022, 4:00 PM IST

पुणे - सध्या विरोधकांकडून शिंदे सरकार मंत्रिमंडळाच्या विस्तार कधी होणार अशी टीका केली जात आहे. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारले असता ते म्हणाले की दोघांच सरकार चांगलं चाललं आहे. ( Chief Minister Eknath Shinde Visit To Pune ) आम्ही शेतकऱ्यांना फोकस केले आहे. शेतकऱ्यांना 50 हजार रुपये द्यायची जी योजना थांबली होती. ती कार्यान्वित केली. पेट्रोल-डिझेलचे भाव कमी केले. तसेच, दुष्काळी भागात पाणी वळवण्याचा काम आम्ही केले आहे अशी यादीच त्यांनी यावेळी वाचून दाखवली.

पुण्यात पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

त्यांच्या घरात जाऊन मी माझे नाव थोडी लिहणार - आम्ही मोठ्या प्रमाणात काम हाती घेतले आहे. परंतु, वारंवार मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार याची चर्चा होत आहे. त्यावर मुख्यमंत्री म्हणाले लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. पुण्यात विभागीय आयुक्त कार्यालया शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली अतिवृष्टीबात आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती, यावेळी ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना संजय राऊत यांच्या घरी त्यांच्या नावाने पैसे सापडले आहेत. ( Cabinet Expansion ) याबाबत विचारले असता ते म्हणाले की, त्यांच्या घरात पैसे सापडे आहेत. त्यावर 'माझे नाव मग कोण लिहील, तेच लिहणार. त्यांच्या घरात जाऊन मी माझे नाव थोडी लिहणार आहे' अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

शेतकऱ्यांना लवकरात-लवकर मदत ही दिली जाणार - राज्यात जेव्हा पूरपरिस्थिती होती तेव्हा मी आणि उपमुख्यमंत्री आम्ही दोघांनी बायरोड जात आम्ही पाहणी केली. त्याचवेळी प्रशासनाला सूचना दिल्या आहेत. शेतकऱ्यांचे कोणतेही नुकसान होऊ नये म्हणून संपूर्ण यंत्रणा अलर्ट आहे. तसेच, ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झालं आहे. अशा शेतकऱ्यांचे पंचनामा हा लवकरात लवकर होणार आहे. आणि तश्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत असही ते म्हणाले आहेत. तसचे, शेतकऱ्यांना लवकरात-लवकर मदत ही दिली जाणार आहे. असही यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.

आमच्यावर आरोप करत आहेत त्यांना हेच उत्तर - शिंदे सरकारवर आरोपाबाबत शिंदे यांना विचारलं असता ते म्हणाले की आज आम्ही जिथे-जिथे जात आहोत तिथे मोठ्या प्रमाणात नागरिक हे प्रतिसाद देताना दिसून येत आहेत. आम्ही जी भूमिका घेतली आहे ती नागरिकांना मान्य आहे, म्हणूनच नागरिक आम्हाला प्रतिसाद देताना दिसून येत आहेत. आज जे आमच्यावर आरोप करत आहेत त्यांना हेच उत्तर आहे असही शिंदे म्हणाले आहेत.

हेही वाचा -Ajit Pawar : मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला अजित पवार आणि नीलम गोऱ्हे अनुपस्थित; राजकीय चर्चेला उधाण

ABOUT THE AUTHOR

...view details