महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Chief Minister Eknath Shinde मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विविध गणशे मंडळांना भेट, घेतले श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Chief Minister Eknath Shinde महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Chief Minister Eknath Shinde ) यांनी श्रीमंत दगडूशेठ गणपतीचे दर्शन ( Shrimant Dagdusheth Halwai Ganpati ) घेतले आहे. यावेळी त्यांनी गणरायाची आरती देखील केली आहे.

Chief Minister Eknath Shinde
Chief Minister Eknath Shinde

By

Published : Sep 7, 2022, 5:23 PM IST

Updated : Sep 7, 2022, 10:07 PM IST

पुणेमहाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Chief Minister Eknath Shinde ) यांनी श्रीमंत दगडूशेठ गणपतीचे दर्शन ( Shrimant Dagdusheth Halwai Ganpati ) घेतले आहे. यावेळी त्यांनी गणरायाची आरती देखील केली. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट( Darshan of Dagdusheth Halwai Ganapati ), सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे त्यांचा महावस्त्र, सन्मानचिन्ह देऊन स्वागत सन्मान करण्यात आला आहे. यावेळी ट्रस्टचे महेश सूर्यवंशी, सुनील रासने, अमोल केदारी, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण, सौरभ रायकर, मंगेश सूर्यवंशी, तुषार रायकर, राजाभाऊ पायमोडे, सुनील जाधव, सचिन आखाडे आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री यांची प्रार्थनाएकनाथ शिंदे म्हणाले, यावर्षीचा गणपती जोरदार आहे ना ! निर्बंधमुक्त गणपती उत्सव ! मोकळ्या मनाने मोकळा श्वास घेत संपूर्ण महाराष्ट्रात गणेशभक्त मोठया उत्साहात, जल्लोषात, धुमधडाक्यात हा उत्सव साजरा करत आहे. हे बघून फार आनंद होत असून समाधान वाटत आहे. तुमच्या आयुष्यात चांगले दिवस येवो, सुख- समृद्धीचे, भरभराटीचे दिवस येवोत. या राज्यावरचे सर्व अरिष्ट, संकट, इडा- पिडा टळू देत, हीच गणरायाचरणी प्रार्थना केल्याचे त्यांनी गणेशभक्तांशी बोलताना सांगितले आहे.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन

गणेश मंडळांना भेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज पुण्यातील विविध गणेश मंडळांना भेट देत आहे सकाळपासूनच पुणे शहरात मुसळधार पाऊस सुरू असून मुख्यमंत्री हे भर पावसात विविध गणेश मंडळांना भेट देत आहे सकाळी 11 वाजता मुख्यमंत्री यांचा दौरा पुण्यात नियोजित होता मात्र दुपारी साडेबाराच्या आसपास मुख्यमंत्री पुण्यात आले आणि त्यानंतर विविध गणेश मंडळांना भेट देत आहे एकूणच मुख्यमंत्र्यांच्या या भर पावसात विविध मंडळांना भेट देत असल्याने पोलीस प्रशासन तसेच विविध यंत्रणाची चांगलीच तारांबळ उडाली आहे.


केसरी वाड्यातील दर्शनानंतर त्यांनी मुक्ता टिळक यांची तब्येत पाहण्यासाठी आणि विचारपूस करण्यासाठी भेट घेतली. केसरी वाड्याबाबत विचारला असता ते म्हणाले की मला लोकमान्य टिळकांचा इतिहास आज पाहता आला याचा आनंद आहे.

Last Updated : Sep 7, 2022, 10:07 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details