महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Vasant More : मुख्यमंत्र्यांनी भेटायला बोलावलं मात्र, राज साहेबांनी मेसेजलाही रिप्लाय दिला नाही : वसंत मोरेंची खंत - मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी वसंत मोरेंना बोलावलं

पुण्यात मनसेचे माजी शहराध्यक्ष वसंत मोरे ( MNS Leader Vasant More ) हे पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याची चर्चा सुरु असताना दुसरीकडे मोरे यांनी खंत व्यक्त केली आहे. मुख्यमंत्र्यांनी मला भेटायला बोलावलं ( CM Thackeray Called Vasant More ) पण, राज साहेबांनी माझ्या मेसेजलाही रिप्लाय दिला ( Raj Thackeray Didnt Reply My Message ) नाही, असं ते म्हणाले.

नाराज वसंत मोरेंना मुख्यमंत्र्यांचा फोन मात्र, मेसेजला राज ठाकरेंचा 'नो रिप्लाय'
नाराज वसंत मोरेंना मुख्यमंत्र्यांचा फोन मात्र, मेसेजला राज ठाकरेंचा 'नो रिप्लाय'

By

Published : Apr 8, 2022, 5:24 PM IST

पुणे : राजीनामा दिल्यानंतर मला सगळ्या पक्षातून मला आमंत्रण आलं. खुद्द मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी देखील मला वरून सरदेसाई यांच्यामार्फत कॉल ( CM Thackeray Called Vasant More ) केला. मी काल रात्री राज ठाकरेंना मॅसेज केला होता. मात्र, साहेबांनी मला रिप्लाय दिला ( Raj Thackeray Didnt Reply My Message ) नाही, अशी खंत मनसेचे माजी शहराध्यक्ष वसंत मोरे ( MNS Leader Vasant More ) यांनी बोलून दाखवली आहे.


म्हणून वसंत मोरे नाराज :मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पाडव्या मेळाव्यातील आपल्या भाषणात मशिदीवरील भोंगे उतरवा अन्यथा आम्ही हनुमान चालीसा लावू असं विधान केलं होतं. त्यांच्या या विधानानंतर राज्यात राजकारण तापलेलं पाहायला मिळत आहे. यानंतर मनसेत सुद्धा सारं काही आलबेल नसलेलं पाहायला मिळत आहे. यानंतर मनसेचे नेते वसंत मोरे यांनी लोकप्रिनिधी म्हणून वेगळी भूमिका घेतली होती. त्यानंतर काल राज ठाकरे यांनी वसंत मोरे यांना पदावरून हटवत साईनाथ बाबर यांची नवीन शहराध्यक्ष म्हणून नेमणूक केली. यानंतरच वसंत मोरे नाराज असल्याचं समोर आलं.

मुख्यमंत्र्यांनी भेटायला बोलावलं मात्र, राज साहेबांनी मेसेजलाही रिप्लाय दिला नाही : वसंत मोरेंची खंत


वसंत मोरे झाले भावनिक : वसंत मोरे पक्षावर नाराज असल्याचे समोर येत आहे. आज सकाळी अनेक कार्यकर्ते वसंत मोरे यांच्या घरी जमत आम्ही त्यांच्यासोबत असल्याचा संदेश दिला आहे. आज जे कार्यकर्ते जमले तेच माझं पंधरा वर्षाचे काम असून, गेली २७ वर्ष मी पक्षासोबत आहे. पण आज माझ्यावर ही वेळ आली, याच दुःख वाटत असल्याचं त्यांनी सांगितलं. मी साहेबांना काल मेसेज केला. याआधी मेसेज केल्यानंतर साहेब लगेच रिप्लाय करायचे. पण काल तसं झाल नाही. मात्र, मी आजही मनसेत असल्याची भूमिका वसंत मोरे यांनी स्पष्ट केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details