महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

छगन भुजबळांची राष्ट्रवादी कोअर कमिटीच्या बैठकीला उपस्थिती; शिवसेना प्रवेशाला पुर्णविराम - ncp core meeting

छगन भुजबळ यांनी शुक्रवारी पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीच्या बैठकीला उपस्थिती लावली. त्यामुळे छगन भुजबळ यांच्या शिवसेना प्रवेशा संदर्भातले वृत्त हे संभ्रम निर्माण करणारेच होते ही बाब स्पष्ट झाली आहे.

छगन भुजबळ

By

Published : Sep 6, 2019, 5:12 PM IST

पुणे- राष्ट्रवादी काँग्रेसमधील ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांची शिवसेना प्रवेशाची गेल्या कित्येक दिवसापासून चर्चा सुरु आहे. मात्र छगन भुजबळ यांनी शुक्रवारी पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीच्या बैठकीला उपस्थिती लावली. त्यामुळे छगन भुजबळ यांच्या शिवसेना प्रवेशा संदर्भातले वृत्त हे संभ्रम निर्माण करणारेच होते ही बाब स्पष्ट झाली आहे.

छगन भुजबळांची बैठकीला उपस्थिती

हेही वाचा - भुजबळांनी पांघरली सेनेची भगवी शाल, शिवसैनिकांकडून जोरदार घोषणांनी स्वागत

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची रणनीती ठरवण्यासाठी पुण्यामध्ये शरद पवार यांच्या उपस्थितीत पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीला छगन भुजबळ यांनी हजेरी लावली. छगन भुजबळ यांच्या सोबतच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार, सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक, पक्षाच्या राष्ट्रीय महिला अध्यक्ष फौजिया खान यांच्यासह प्रमुख नेते उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details