पुणे - आज (गुरुवार ७ ऑक्टोबर) पासून शारदीय नवरात्राचा प्रारंभ होत आहे. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी म्हणजेच अश्विन शुक्ल प्रतिपदा तिथीला घटस्थापना केली जाते. काही लोक याला कलश स्थापना असेही म्हणतात. या शारदीय नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने चतु:श्रुंगी मंदिरात देखील घटस्थापना करण्यात आली आहे. शारदीय नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधींनी चतु:श्रुंगी मंदिर परिसर आणि चतु:श्रुंगी मातेचे माहात्म्ये जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे.
- 'अशी' आहे चतु:श्रुंगी मातेची आख्यायिका -
नाशिकनजवळच्या वणीचे म्हणजेच सप्तश्रुंगीदेवीचे पुण्यातील स्थान म्हणजे चतु:श्रुंगी. सप्तश्रुंगनिवाशिणी ही साडेतीन शक्तीपीठांपैकी एक व अनेकांची कुलस्वामिनी. पेशवाईतील प्रसिद्ध सावकार दुलभशेठ या देवीचा मोठा भक्त होता व तो वणीला दर्शनास नेहेमी जात असे. कालांतराने त्याचे वय झाल्यावर देवीने त्याच्यासाठी तत्कालीन पुण्यानजीक प्रकट होत असल्याचा दृष्टांत दिला होता. परंतु वेळेआधीच दुलभशेठ देवीने सांगितलेल्या ठिकाणी पोहोचला तेव्हा देवी पूर्ण प्रकट झालेली नसून तीन हात व चेहराच प्रकट झाल्याचे त्यास आढळून आले. हे स्थान म्हणजेच चतु:श्रुंगी होय. अर्थातच या स्थानी दुलभशेठने मंदिर बांधले. दुलभशेठने या मंदिराचा पाय उभारला, अशी आख्यायिका आहे.
- 'अशी' आहे चतु:श्रुंगी मंदिराची आख्यायिका -