पुणे - आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात पंच असलेल्या किरण गोसावी याच्याविरुद्ध नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक केल्याचे तीन गुन्हे पुण्यात दाखल होते. (Chargesheet filed against Kiran Gosavi) त्यातील फरासखाना आणि लष्कर पोलीस ठाणे येथे दाखल गुन्ह्यात किरण गोसावी याच्याविरुद्ध नुकतेच दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे गोसावी याच्या अडचणीत वाढ झाली आहे.
फरासखाना पोलिसांकडे तक्रार दिली होती
(2018)मध्ये गोसावी याने आपल्या फेसबुक अकाऊंटवर मलेशियात हॉटेलमध्ये नोकरीची संधी असण्यासंदर्भात पोस्ट टाकली होती. त्या पोस्टवर चिन्मय देशमुख या तरुणाने प्रतिसाद दिला होता. (Chargesheet filed Kiran Gosavi) त्यांच्याकडून तीन लाख रुपये घेऊन गोसावीने त्याला मलेशियाला पाठविले. मात्र, तेथे नोकरी न दिल्याने तो भारतात परत आला. त्यानंतर त्याने फरासखाना पोलिसांकडे तक्रार दिली होती. या गुन्ह्यात गोसावी फरार होता. त्यामुळे फसवणुकी संदर्भात फरासखाना पोलीस किरण गोसावीचा शोध घेत होते.