महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Chandrkant Patil Critisize MVA Government : राणे महाविकास आघाडीतील सगळ्यांना पुरून उरतील - चंद्रकांत पाटील

नितेश राणेंना मतदानाचा ( Nitesh Rane ) अधिकार नाकारणे हे अतिशय चुकीचे असून ते या विरोधात दाद मागतील आणि त्यांना न्याय मिळेल, असे विधान भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील ( Bjp State President Nitesh Rane ) यांनी पुण्यात बोलताना केले आहे. तसेच राणे या सर्वांना पुरून उरतील, असेही ते म्हणाले.

Chandrkant Patil Critisize MVA Government
Chandrkant Patil Critisize MVA Government

By

Published : Jan 2, 2022, 4:57 PM IST

पुणे -नितेश राणेंना मतदानाचा अधिकार नाकारणे हे अतिशय चुकीचे असून ते या विरोधात दाद मागतील आणि त्यांना न्याय मिळेल, असे विधान भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील ( Bjp State President Nitesh Rane ) यांनी पुण्यात बोलताना केले आहे. या अगोदर नारायण राणेंना बोलण्याचं धाडस कोणी केलं नाही आता ते सगळे एकत्र येत धाडस दाखवत आहेत, पण राणे या सगळ्यांना पुरून उरतील, असा इशारा देखील त्यांनी दिला.

'राज्यातील सरकार आर्टिफिशयल' -

राज्यात सुरू असलेल्या नितेश राणे यांच्या अटकेच्या कारवाईसंदर्भात बोलताना चंद्रकांत पाटील यांनी मुळात राणेंना नोटीस पाठवणे हेच हास्यास्पद असल्याचे म्हटले आहे. गेल्या २६ महिन्यांपासून जनतेचा कौल झुगारून सत्तेत आलेलं हे आर्टिफिशयली सरकार केवळ सत्तेचा दुरुपयोग करत आहे, राज्यात फक्त मनमानी कारभार करणे आणि नको त्या ठिकाणी घालून तोंड फोडून घेणं एवढाच उद्योग हे महाविकास आघाडी सरकार करत असल्याची टीकादेखील चंद्रकांत पाटील यांनी यावेळी केली.

'हे सांगायला पवारांनी वेळ का घेतला' -

दरम्यान, काही दिवसांपूर्वी शरद पवार यांनी एका कार्यक्रमात बोलताना नरेंद्र मोदी यांनी राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी ऑफर दिली होती, असा गौप्यस्फोट केला होता. यासंदर्भात बोलताना, शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांच्यात नेमकी काय चर्चा झाली हे सांगण्यासाठी मी खूप छोटा कार्यकर्ता असून मोदींनी ऑफर दिली होती. हे सांगायला शरद पवार यांना इतके महिने का लागले, अशी प्रतिक्रिया चंद्रकात पाटील यांनी दिली.

हेही वाचा -Raosaheb Danve On shivsena : "शिवसेनेत आग लावण्याचे काम माझं नाही"

ABOUT THE AUTHOR

...view details