महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

'नाथाभाऊंचे समाधान होण्यासाठी लिमलेटची गोळी देतात की कॅडबरी देतात ते पाहू..' - ncp news

एकनाथ खडसेंचा दोन वाजताचा राष्ट्रवादी पक्षप्रवेश चार वाजेपर्यंत का लांबला, याचं उत्तर आधी जयंत पाटलांनी द्यावं. नाथा भाऊंना नेमकं काय द्यायचं हे अजून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ठरलेलं नाहीये. तुमचे समाधान होईल असे देऊ असं त्यांना सांगण्यात आले. त्यावर नाथाभाऊ समाधानी होतात की नाही, हे येणारा काळ ठरवेल.. असा टोला चंद्रकात पाटील यांनी लगावला.

Chandrakant Patil
चंद्रकात पाटील

By

Published : Oct 23, 2020, 5:18 PM IST

Updated : Oct 23, 2020, 5:30 PM IST

पुणे - देवेंद्र फडणवीस सर्व प्रकारच्या थपडा खातात परंतु राज्याच्या आणि पक्षाच्या हितासाठी शांत राहतात. त्यांचा शांतपणा हा कमकुवतपणा नाही तर मनाचा मोठेपणा आहे. नाथाभाऊंनी एकट्या देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करणं योग्य नाही. भारतीय जनता पार्टीत जे निर्णय होतात ते सामूहिक पद्धतीने होतात. त्यामुळे एकाला टार्गेट करायचं आणि इतरांना तुमचा काही दोष नाही म्हणायचं ही नाथाभाऊंची भूमिका बरोबर नाही. एकनाथ खडसे यांच्या बाबतीतलं अर्धसत्य फडणीस यांनी काही दिवसांपूर्वी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.

प्रतिक्रिया देताना चंद्रकांत पाटील
चंद्रकांत पाटील आज पुण्यात एका कार्यक्रमासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली. चंद्रकांत पाटील म्हणाले, की नाथाभाऊंनी तिथे चांगले काम करावे. नाथाभाऊंनी जायला नको होते. पक्षात त्यांना योग्य तो सन्मान मिळत होता. त्यांच्या नाराजीवर बसून काही ना काही मार्ग निघाला असता. तरीही ते जात असतील तर जिथे जातील तिथे त्यांनी चांगलं काम करावं, अशा त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत.नाथा भाऊंना लिमलेटची गोळी देतात की कॅडबरी देतात हे पाहावे लागेल -दोन वाजताचा पक्षप्रवेश चार वाजेपर्यंत का लांबला, याचं उत्तर आधी जयंत पाटलांनी द्यावं. नाथा भाऊंना नेमकं काय द्यायचं हे अजून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ठरलेलं नाहीये. तुमचे समाधान होईल असे देऊ असं त्यांना सांगण्यात आले. त्यानंतर नाथाभाऊ नरिमन पॉईंट मधल्या फ्लॅटवरून बळेबळे बाहेर पडले. समाधान होण्यासाठी लिमलेटची गोळी ही देतात आणि कॅडबरीही देतात. त्यावर नाथाभाऊ समाधानी होतात की नाही, हे येणारा काळ ठरवेल..

सरकारची शेतकऱ्यांनी तुटपुंजी मदत -
कधी नव्हे ते उद्धव ठाकरे बाहेर पडले होते. भरीव मदत मिळेल असं वाटलं होतं, पण सरकारने तुटपुंजी मदत जाहीर केली. सरकारच्या अपुऱ्या मदतीने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली गेली आहेत. अशी टीका पाटील यांनी राज्य सरकारच्या मदतीवर केली.

जीएसटीवरूनही पाटील यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला. पाटील म्हणाले, की केंद्राकडून जीएसटी भरपाईपोटी किती रक्कम मिळणार हे आधी ठरवा. याबाबत महाविकास आघाडीत एकवाक्यता नाही. कुणी म्हणतंय 38 हजार कोटी कोणी म्हणतं 60 हजार कोटी. पण जीएसटी भरपाई अन् शेतकरी मदत ही तुलना बरोबर नाही, अशी टीका त्यांनी सरकारवर केली.

Last Updated : Oct 23, 2020, 5:30 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details