महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Chandrakant Patil : सेक्सटॉर्शनच्या घटनांवर लवकरच बैठक घेऊन मार्ग काढणार - चंद्रकांत पाटील - सेक्सटॉर्शनच्या घटनांवर बैठक

पुणे शहरात मागच्या आठवड्यात सेक्सटॉर्शनच्या (sextortion) त्रासाला कंटाळून दोन युवकांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली होती. (suicide due to sextortion). शहरात अश्या सेक्सटॉर्शनच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. (sextortion in pune). यावर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

चंद्रकांत पाटील
चंद्रकांत पाटील

By

Published : Oct 15, 2022, 4:44 PM IST

पुणे: पुणे शहरात मागच्या आठवड्यात सेक्सटॉर्शनच्या (sextortion) त्रासाला कंटाळून दोन युवकांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली होती. (suicide due to sextortion). शहरात अश्या सेक्सटॉर्शनच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. (sextortion in pune). वर्षभरात पुणे सायबर पोलीस स्टेशन येथे सेक्सटॉर्शनचे तब्बल 1400 अर्ज आले आहेत, तर सेक्सटॉर्शन बाबत एक गुन्हा देखील दाखल आहे. यावर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मी देखील या प्रकरणाबाबत चिंतित असून लवकरच बैठक घेऊन मार्ग काढणार आहे, असं पाटील यावेळी म्हणाले.

देशाचे माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांची जयंती ही वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्यात येते. या निमित्ताने उच्च व तंत्रशिक्षण विभाग आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने वाचन प्रेरणा दिन व उच्च व तंत्रशिक्षणमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्यासोबत मुक्त संवाद, या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी ते बोलत होते.

चंद्रकांत पाटील

काय म्हणाले चंद्रकांत पाटील:या प्रसंगी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, पुढच्या आठवड्यात पालकमंत्री म्हणून मी सगळ्याच विषयांचा आढावा घेणार आहे. पोलीस विषयाचा आढावा घेत असताना सेक्सटॉर्शनचा विषय उपस्थित केला जाणार आहे. याच्यावर काय उपाय योजना करता येईल, कंप्लेट येण्यापासून तर त्यांची वेळेत दखल घेण्यापर्यंत तसेच धाडस वाढविण्यासाठी काय काय करता येईल यासाठी उपाय योजना केल्या जाणार आहेत. अशा प्रकरणात लोकं सहसा पुढे येत नाहीत त्यामुळे आत्महत्ये सारखे टोकाचे पाऊल उचलल्या जाते असे देखील पाटील म्हणाले.

कशी होते फसवणूक? :

1) पहिली स्टेज - सुरवातीला आपल्याला आपल्या व्हॉट्सॲप वर एका अनोळखी नंबरवरून एका सुंदर मुलीचं फोटो येतो आणि त्यांनतर एक हाय म्हणून मॅसेज येती. आपण जर त्याला प्रतिसाद दिला तर त्यातून हळूहळू आपल्यासोबत ओळख वाढवली जाते.

2) दुसरी स्टेज -आपण जर आलेल्या मॅसेजला प्रतिसाद दिला तर समोरून व्हिडियो कॉल साठी आग्रह केला जातो. आपण जर व्हिडियो कॉल केला की समोर असलेली मुलगी न्यूड होते, आणि आपल्याला ही न्यूड होण्याबाबत आग्रह करते. आपला चेहरा कॅपचर होऊ पर्यंत हा व्हिडियो कॉल केला जातो आणि एकदा का तो कॅपचर झाला की लगेच आपल्या व्हॉट्सॲप वर त्या व्हिडियो कॉल चा व्हिडियो पाठवल्या जातो.

3) तिसरी स्टेज -जेव्हा हा व्हिडियो पाठवल्या जातो तेव्हा समोरून धमक्या सुरू होतात. जर पैसे नाही दिले तर सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल केला जाईल अशी धमकी दिल्या जाते. जर त्याला प्रतिसाद नाही दिला तर एका अनोळखी व्यक्ती कडून कॉल येतो आणि थेट धमकी दिली जाते. या धमकीला तरुण बळी पडतात आणि पैसे देतात. एकदा पैसे दिल्यावर दर दोन-तीन दिवसांनी वारंवार पैश्यांची मागणी केली जाते. अशाप्रकारे या प्रकाराला कंटाळून बदनामी होऊ नये म्हणून तरुण टोकाचं पाऊल उचलतात.

ABOUT THE AUTHOR

...view details