पुणे -पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (शनिवारी-28) पुणे दौऱ्यावर येत आहेत. कोरोना लस निर्मितीचा आढावा घेण्यासाठी ते पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटला भेट देणार आहेत. त्यांच्या या दौऱ्याबद्दल बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी 'पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या कामाचे कौतुक करण्यासाठी पुण्यात येत आहेत' अशी टिप्पणी केली होती. त्यावर आता भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, आमदार चंद्रकांत पाटील यांनी ' सुप्रिया सुळे स्वप्नात आहेत का?' असा उपरोधिक टोला त्यांना लगावला आहे.
महात्मा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त चंद्रकांत पाटील यांनी पुण्यातील भिडे वाडा या ठिकाणी जाऊन महात्मा फुले यांना आदरांजली वाहिली. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधत असताना त्यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर उपहासात्मक टीका केली.
चंद्रकांत पाटलांचा सुप्रिया सुळेंना टोला, म्हणाले.. त्या स्वप्नात आहेत का ? - pm in pune
पंतप्रधान मोदी आज पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटला भेट देणार आहेत, त्यावरून सुप्रिया सुळे यांनी टीका केली होती. त्यांच्या या टीकेल प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रत्युत्तरादाखल उपरोधिक टीका केली.

चंद्रकांत पाटलांचा सुप्रिया सुळेंना टोला म्हणाले
हे सरकार सर्वच स्तरावर अपयशी ठरले आहे. तसेच गोंधळलेले आणि समूह भावना नसलेले हे सरकार आहे. सरकारमधील प्रत्येकजण आपापला वेगळा निर्णय घेतो. त्यानंतर मग सरकारमधील दुसरा घटक पक्ष ते होणार नाही म्हणून सांगतो. या सर्वांमध्ये सर्वसामान्य माणसांची मात्र परवड होत असल्याची टीकाही पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारवर केली.
Last Updated : Nov 28, 2020, 4:31 PM IST