पुणे -काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे लोक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फसवत आहेत. राज्य सरकारने केलेली कर्जमाफी फसवी आहे, असा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला. पुणे शहरात आयोजीत केलेल्या स्वच्छता मोहिमेत चंद्रकांत पाटील सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी माध्यमांना आपली प्रतिक्रिया दिली.
चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रिया... हेही वाचा... प्रत्येक पक्षात नाराजी तशीच भाजपमध्येही.. बैठकीतील चर्चेवर बोलण्यास विखेंचा नकार
आताच्या सरकारने केलेली कर्जमाफी ही फसवी आहे. आमच्या सरकारने 2001 ते 2016 पर्यंत दीड लाखांची कर्जमाफी केली. त्यामुळे या सरकारमध्ये फक्त 2016 ते चालुपर्यंतचीच कर्जमाफी होणार आहे. त्यातही शासनाने बनवलेल्या निकषात पिक कर्जमाफी, असा उल्लेख आहे. त्यामुळे याचा खरे तर शेतकऱ्यांना फायदा होणार नाही, तर भलत्यांनाच फायदा होणार आहे. खासकरून काँग्रस राष्ट्रवादीच्या लोकांनाचा याचा फायदा होणार असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.
हेही वाचा.... सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का? फडणवीसांचा सेनेवर हल्लाबोल
काँग्रेसच्या नेत्यांच्या दोन साखर कारखान्यावर दोनशे कोटींची कर्ज आहेत. त्यामुळे कर्जमाफीच्या निर्णयामुळे त्यांचेच कर्जमाफ होईल, असा आरोप कोणाचेही नाव न घेता चंद्रकांत पाटील यांनी केला. उध्दव ठाकरे यांनी जी शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी केली, ती चुकीची आहे. याचा फायदा खऱया अर्थाने राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या पक्षातील लोकांनाच होणार आहे. या दोन्ही पक्षातील लोक उद्धव ठाकरे यांची फसवणूक करत आहेत, असा टोला पाटील यांनी लगावला.
पुणे महानगरपालिकेच्यावतीने आयोजित स्वच्छता मोहिमेत चंद्रकांत पाटील यांनी सहभाग घेतला हेही वाचा... देशभरातील ठळक घडामोडींवर एक नजर...
पुणे महापालिकेच्यावतीने शहरात स्वच्छता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, महापौर मुरलीधर मोहोळ तसेच इतर अनेक कार्यकर्ते आणि सामान्य नागरिक उपस्थित होते. मागच्या सरकारने 2001 ते 2016 पर्यंतची कर्जमाफी केलेलीच आहे. मग हे सरकार नेमकं कोणाची कर्जमाफी करणार, असा प्रश्न पाटील यांनी यावेळी विचारला. तसेच फक्त पीक कर्जाची कर्जमाफी होणार असल्याने काँग्रेसच्याच काही लोकांना याचा फायदा होईल. यात ज्यांच्या बँका, सुतगिरण्या आहेत त्यांच्यासाठीच ही कर्जमाफी आहे, असा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला.
हेही वाचा.... 'कावळ्याच्या शापाने काही गुरं मरत नाहीत'