पुणे -पुणे महापालिकेत नव्याने 34 गावे समाविष्ट झाल्यामुळे पुणे महानगरपालिकेचे ( Pune Municipal Corporation ) लोकसंख्या तब्बल 70 लाखांवर गेली आहे. असे असताना प्रगती कशी होणार? असा सवाल करत पुण्यामध्ये दोन महानगरपालिका ( Two Municipal Corporations ) व्हायला पाहिजे, अशी मागणी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील ( BJP state president Chandrakant Patil ) यांनी केली आहे. ते महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेवाळेवाडीत बोलत होते.
पुणे महानगरपालिका निवडणूक जवळ येत आहे. याच महापालिकेच्या निवडणुकीवरुन आता राजकारण तापताना दिसत आहे. प्रत्येक पक्ष हे कामाला लागलेले पाहायला मिळत आहेत. ताकाला जाऊन मला भांड लपवायची सवय नाही, मी आलो आहे पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत तुमच्या मताची भीक मागायला, असेही यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले.
अजित पवारांवर टीका
महानगरपालिकेत गावे समाविष्ट करण्याला माझा विरोधच, यामुळे गावाचे गावपण नष्ट होते. मात्र अजित पवारांना वाटत म्हणून ते निर्णय घेतात, अशी टीका देखील चंद्रकांत पाटील यांनी अजित पवारांवर केली आहे.