महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

नवाब मलिक यांनी बहुतेक मंत्रिमंडळातून राजीनामा दिला आहे - चंद्रकांत पाटील - Chandrakant Patil latest news

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी बहुतेक मंत्रिमंडळातून राजीनामा दिला आहे. मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री असताना ते प्रेसच्या माध्यमातून मागणी करत आहात. त्यावरून नवाब मलिक यांनी बहुतेक मंत्रिमंडळातून राजीनामा दिला असे वाटते, असा टोला भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मलिकांना लगावला.

chandrakant patil
चंद्रकांत पाटील

By

Published : Nov 6, 2021, 11:14 AM IST

पुणे - भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज पत्रकारांशी बोलतानाराष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक आणि राज्य सरकारवर जोरदार टीका केली. नवाब मलिक यांनी बहुतेक मंत्रिमंडळातून राजीनामा दिला आहे. मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री असताना तुम्ही प्रेसच्या माध्यमातून मागणी का करत आहात. सरकार तुमचं आहे. एक गृहमंत्री जेलमध्ये गेले तरी दुसरे आहेत. सत्ता तुमची आहे. एसआयटी अपॉइंट करा किंवा डबल एसआयटी अपॉइंट करा. रोज सकाळी उठायचं आणि ट्विट करायचं आणि प्रेस घ्यायची. बहुतेक मलिक यांना मंत्रिमंडळातुन काढलं आहे. कारण, मंत्रिमंडळातुन काढलेल्या व्यक्तीनेच मागणी करायची असते, असा टोला भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मलिक यांना लगावला आहे.

चंद्रकांत पाटील यांची नवाब मलिकांवर टीकास्त्र
नवाब मलिक यांनी इतक्या मोठ्या विषयात एजन्सीची स्वायत्तता असताना पडू नये. त्यांनी पडायचं का नाही हे त्यांनी ठरवायचं आहे. आमच्यात एवढा समजूतदारपणा आहे की त्या-त्या विषयात आपण मध्ये पडू नये. ना आपण त्या एजन्सीचे अधिकारी आहोत. त्यामुळे त्यांनी त्यांचं काम करावं. दिल्लीवरून अधिकारी आणला म्हणजे तपास काढून टाकला की सपोर्ट लागला. वानखडेकडून तपास काढून टाकला, यात का पडायचं. म्हणून मला वाटतं की या प्रकरणात बोलणं माझ्यासाठी उचित नाही, असे यावेळी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं. वातावरण संपूर्ण गढूळ -कोंबडी आधी का अंडा आधी या सर्व प्रकरणाची सुरवात ही नवाब मलिक यांनी केली आहे. त्यात काहीही कारण नव्हता. शाहरुख खान म्हणजे काही विशेष व्यक्ती नाही की त्याच्या मुलाला पकडल्यानंतर इतक्या आक्रमकपणे पक्ष आणि सरकार म्हणून मध्ये पडावं. जर उतरायचं असेल तर तुम्ही तेवढ्या विषयापर्यंत मर्यादित राहावं. इकडं तिकडं कशाला तलवारी फिरवता. देवेंद्र फडणवीस यांच्यावर ते बोलले म्हणून मी आणि देवेंद्रजी यांनी याप्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे. राज्याचे प्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांनी राज्यातील गढूळ वातावरण पाहता त्यांनी चार प्रमुख नेत्यांची बैठक घेतली पाहिजे आणि काय चाललं आहे हे पहावं. राज्यातील बड्या नेत्याचं ट्विट बघितलं खूपच घाणेरडे ट्विट होते.राज्याचा राजकारण कुठं चाललं आहे हे बघावं लागणार आहे, असं यावेळी पाटील म्हणाले.जयंत पाटील यांच्या सल्ल्याची आम्हाला गरज नाही -जयंत पाटील यांच्या सल्ल्याची आम्हाला गरज नाही. तुम्ही तुमचं बघावं आम्ही खूप सक्षम आहोत. तुम्हाला इस्लामपूरच्या बाहेर स्थान निर्माण करता आलेला नाही. तुम्ही आम्हाला शहाणपणा शिकवू नये, असा टोला देखील त्यांनी जयंत पाटील यांना लगावला आहे.नाचता येईना आंगण वाकडे -नाचता येईना आंगण वाकडे.....प्रत्येक वेळेला केंद्र केंद्र करावं, आत्ता सर्वसामान्य नागरिकांनी पत्राच्या माध्यमातून शरद पवार यांना प्रश्न विचारावं की कोविडमध्ये तुम्ही नेमका किती खर्च केला. रेशन केंद्राने मोफत दिलं. लस केंद्राने मोफत दिल्या. सगळा खर्च केंद्राने केला. तुम्ही कोविडवर खर्च केला नाही. तसेच शेतकऱ्यांना मदत दिली नाही. एसटी कर्मचाऱ्यांना मदत नाही. दर वेळेला उठायचं आणि केंद्रावर बोलायचं. पेट्रोल डिझेलचे दर केंद्राने कमी केले आहेत. 14 राज्यांनी देखील दर कमी केलं आहे. आत्ता तुम्ही दर कमी करा, असे चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details