महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

नाना पटोले महाराष्ट्राचे पप्पू, चंद्रकांत पाटलांचा पलटवार - सहकार क्षेत्राला बळकटी

ज्याप्रमाणे केंद्रात एक पप्पू आहे, त्याचप्रमाणे नाना पटोले हे महाराष्ट्राचे पप्पू आहेत. उठसुठ ते काहीही आरोप करत असतात, अशा शब्दात भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पटोले यांना टोला लगावला.

चंद्रकांत पाटील
चंद्रकांत पाटील

By

Published : Jul 10, 2021, 3:18 PM IST

पुणे -ज्याप्रमाणे केंद्रात एक पप्पू आहे, त्याचप्रमाणे नाना पटोले हे महाराष्ट्राचे पप्पू आहेत. उठसुठ ते काहीही आरोप करत असतात, अशा शब्दात भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पटोले यांना टोला लगावला. पटोले यांनी शुक्रवारी पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत नुकत्याच झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारावर टीका करताना डबे नाही तर इंजिन बदलण्याची गरज आहे, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली होती. त्यावर प्रत्युत्तर देताना चंद्रकांत पाटील बोलत होते.

'..या गावांच्या विकासासाठी 10 हजार कोटींचा निधी द्यावा'

चंद्रकांत पाटील यांच्या निवासस्थानी नव्याने समाविष्ट झालेल्या 23 गावातील लोकप्रतिनिधी आणि नागरिकांची बैठक पार पडली. यावेळी ग्रामस्थांनी गावातील समस्या चंद्रकांत पाटील यांच्यासमोर मांडल्या. त्यानंतर पार पडलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. चंद्रकांत पाटील म्हणाले, पुणे महापालिकेत ही 23 गावे घेण्याचा अट्टहास का करण्यात आला हे मला माहीत नाही. परंतु तरीही आम्ही या निर्णयाचे स्वागत करतो. राज्य सरकारने आता नव्याने समावेश झालेल्या गावांच्या विकासासाठी 10 हजार कोटींचा निधी द्यावा. सोबतच नव्याने समावेश झालेल्या गावांची तिसरी महापालिका करण्यात यावी.

'गडकरींच्या साखर कारखान्यात गैरव्यवहार झालाच नाही'
चंद्रकांत पाटील म्हणाले, जरंडेश्वर साखर कारखाना हे हिमनगाचे टोक आहे. राज्यातील अनेक साखर कारखान्यात अशाप्रकारे भ्रष्टाचार झाला आहे. त्यामुळेच मी अमित शहा यांना या कारखान्याची यादी दिली आहे. अण्णा हजारेंनी ही यादी पाच वर्षांपूर्वीच दिलेली आहे. या यादीत नितीन गडकरींचे दोन साखर कारखाने असले तरी त्यात कुठलाही गैरव्यवहार झालेला नाही. याशिवाय सहकार मंत्रालयाची जबाबदारी अमित शहा यांच्याकडे देण्याचा निर्णय वर्षभरापूर्वीच झाला असेल. आमच्याकडे या मंत्रालयाची जबाबदारी दिल्यामुळे आता सहकार क्षेत्राला बळकटी मिळेल.

हेही वाचा -नितीन गडकरी यांच्या खासदारकीला नाना पटोलेंचे न्यायालयात आव्हान; सुनावणी ६ ऑगस्टला

ABOUT THE AUTHOR

...view details