पुणे - महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एखाद्या भयानक गोष्टीला सुद्धा कसं बाजूला ढकलता येईल आणि आपण कसे क्लीन आहोत हे दाखवता येईल याचा जो प्रयत्न चालला आहे. हे अत्यंत निंदनीय आहे. सुसंस्कृत महाराष्ट्राला ते घातक आहे. असे म्हणत सामाजिक न्याय मंत्री धंनजय मुंडे यांच्यावर असलेल्या बलात्काराच्या आरोपावरून भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी संताप व्यक्त करत धंनजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला. ते पिंपरी-चिंचवडमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील रेणू शर्माच्या व्यतिरिक्त तिची बहीण करूणा शर्मा याविषयावर बोला -चंद्रकांत पाटील म्हणाले की, धनंजय मुंडे आणि रेणू शर्मा यांच्या विषयामध्ये भारतीय जनता पक्षाने सुरुवातीपासूनच भूमिका मांडली होती. तिची तक्रार खरी आहे की खोटी आहे हे पोलिसांनी चौकशी करावी मग निर्णय घ्यावा असं पाटील म्हणाले. वारंवार आम्ही म्हणत होतो की रेणू शर्माच्या व्यतिरिक्त तिची बहीण करूणा शर्मा याविषयावर बोला. तिच्याबद्दल माझे 15 वर्ष शारीरिक संबंध होते. हे धंनजय मुंडे यांनी मान्य केलं. तिला दोन माझ्यापासून मुले आहेत हे मान्य केलं. त्यांना नाव दिले हे मान्य केले. अफिडेव्हीटमध्ये दोन मुलं दाखवली नाहीत हे मान्य केलं. हे अनैतिक आणि बेकायदेशीर आहे. त्यामुळे आम्ही त्यांचा राजीनामा मागितला होता.
महाराष्ट्रातील नैतिकता संपली आहे का?शिताफीने दाखविण्याचा प्रयत्न होतोय की, धंनजय मुंडेवरची रेणू शर्माने केस मागे घेतली म्हणजे ते निर्दोष झाले. त्यांना क्लीन चिट द्या, त्यांची बदनामी झाली, बदनामी करणाऱ्या आणि आंदोलन करणाऱ्या संघटनांवर कारवाई करा हे चाललंय काय? संपली का नैतिकता या महाराष्ट्रातील, असा संताप त्यांनी व्यक्त केला आहे.
क्लीन चिट मिळाल्याचे ढोल वाजवून सांगितलं जात आहे -पुढे ते म्हणाले की, अशा प्रकरणामध्ये याअगोदर अनेकांनी राजीनामा दिला आहे. हे आम्ही पाहिलं आहे. येथे तर तुम्ही मान्य करत आहात की 15 वर्ष शारीरिक संबंध होते. हे भारतीय परंपरेमध्ये बसतं का? भारतीय कायद्यामध्ये बसतं का? हिंदू कायद्यात दोन बायकांना परवानगी आहे का? ढोल वाजवून सांगितलं जात आहे की त्यांना क्लीन चिट मिळाली. रेणू शर्माने केलेली तक्रार बरोबर आहे की नाही, मागे घेताना दबाव निर्माण झाला का? हे विषय आमचे नाहीत पोलिसांनी चौकशी करावी. केवळ करुणा शर्मा बद्दल बोला. हे जे चाललं आहे ना ते सुसंस्कृत महाराष्ट्राला घातक आहे, असे परखड मत चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले आहे.