पुणे - गेल्या दिवसांपासून शिवसेना आणि राणा दाम्पत्याच्यामध्ये संघर्ष पाहायला मिळत आहे. हा संघर्ष पार हातापाई पर्यंत गेल्याचे पाहायला मिळाले आहे. त्यानंतर आता खासदार नवनीत राणांच्या रुग्णालयातील फोटोवर शिवसेनेने आक्षेप घेतला आहे. यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आताची शिवसेना जुनी शिवसेना झाली आहे. शिवसेनेला वाटत नाही की ते सरकारमध्ये आहे. काहीही झाले की लगेच छोंडेंगे नही, असा मूड झाला आहे, अशी टीका चंद्रकांत पाटलांनी शिवसेनेवर केली ( Chandrakant Patil Criticized shivsena ) आहे.
चंद्रकांत पाटलांनी आज ( 9 मे ) महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांची शहरातील विविध प्रश्नांसदर्भात भेट घेतली. त्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. बालगंधर्व रंगमंदिर पाडण्यात येणार आहे. त्याबाबात विचारले असता पाटील यांनी सांगितले की, आज एखाद्या वेळेला रंगकर्मींचे नुकसान होईल. पण, भविष्यात मोठी वस्तू तयार होणार आहे. यामुळे अधिक नाटके आणि अधिक सांस्कृतिक कार्यक्रम होतील. कुठलीही वस्तू भव्यदिव्य होतानाच जो वेळ असतो, तो त्रासाचा असतो. पण, तरीही याबाबत रंगकर्मी बरोबर बैठक करू, असे पाटील यांनी स्पष्ट केले.