महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Chandrakant Patil Criticized Shivsena : 'राज्यात सध्या कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे उडालेत', चंद्रकांत पाटलांची शिवसेनेवर टीका - चंद्रकांत पाटील नवनीत राणा आंदोलन प्रतिक्रिया

राज्यात सध्या कायदा सुव्यवस्थेचे ( Law And Order in Maharashtra ) धिंडवडे उडाले आहेत. महविकास आघाडी ( Mahavikas Aghadi Government ) सत्तेत असताना रस्त्यावर उतरून हल्ला करणे हा नवीन पॅरामीटर या सरकारने सेट केला असल्याची टीका भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील ( Chandrakant Patil Criticized Shivsena ) यांनी केली आहे. तसेच नवनीत राणा यांच्या मुंबईतल्या आंदोलनावरूनही त्यांनी शिवसेनेवर टीका केली.

Chandrakant Patil Criticized Shivsena
Chandrakant Patil Criticized Shivsena

By

Published : Apr 23, 2022, 4:53 PM IST

Updated : Apr 23, 2022, 8:47 PM IST

पुणे -राज्यात सध्या कायदा सुव्यवस्थेचे ( Law And Order in Maharashtra ) धिंडवडे उडाले आहेत. महविकास आघाडी ( Mahavikas Aghadi Government ) सत्तेत असताना रस्त्यावर उतरून हल्ला करणे हा नवीन पॅरामीटर या सरकारने सेट केला असल्याची टीका भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील ( Chandrakant Patil Criticized Shivsena ) यांनी केली आहे. तसेच हे सरकार केवळ अराजकता माजवत असल्याच्या आरोप त्यांनी केला आहे.

प्रतिक्रिया

काय म्हणाले चंद्रकांत पाटील -सरकार फक्त रस्त्यावर हल्ले करत आहे. आमच्या पोलखोल यात्रेवर हल्ला झाला आणि काल मोहित कंभोज यांच्या गाडीवर हल्ला केला. यावरून सरकारची मानसिकता लक्षात येते, असे चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले आहेत. खासदार नवनीत राणा या आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानी जाऊन हनुमान चालीसा पठण करणार, असा इशारा दिला होता. त्यानंतर कालपासून मुंबईत राजकारण ( Mumbai Hanuman Chalisa Politics ) तापलेल पाहायला मिळत आहे. त्यावरून चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेवर जोरदार हल्ला चढवला आहे. आज जे मुंबईत सुरू आहे, तो हाय व्होल्टेज ड्रामा आहे. या सगळ्याचा आम्ही विरोध करत आहोत. जर कारवाई करायची असेल किंवा राणा यांना ( Navneet Rana Agitation In Mumbai ) अडवायच असेल, तर ते पोलिसांचं काम आहे. तुमचे कार्यकर्ते तिथे कशाला, असा सवाल देखील पाटील यांनी शिवसेनेला केला आहे. त्याचबरोबर कुणी हनुमान चालीसा ( Hanuman Chalisa ) म्हणत असेल तर त्यात गैर काय, असा सवालदेखील चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. त्याचबरोबर तुम्हाला काही चुकीचं वाटत असेल तर तशी तक्रार करा फौजफाटा कशाला उभा करता असं म्हणत राणांनी काय मागणी करावी, हा त्यांचा प्रश्न असून राणा हनुमान चालीसा म्हणणार आहेत की राक्षस चालीसा, तुम्ही का रोखत आहात, असा घणाघात त्यांनी केला आहे.

हेही वाचा -Ravi Rana Called Off Protest : 'पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यामुळे आंदोलन मागे घेत आहोत', राणा दाम्पत्याची घोषणा

Last Updated : Apr 23, 2022, 8:47 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details