पुणे -केंद्र सरकारकडून राज्याला मिळणारा निधी मिळाला नाही, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रसारमाध्यमांना बोलताना दिली ( Ajit Pawar On Center Government ) होती. त्याला आता भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे. काहीही दिलं तरी राज्य सरकावर प्रत्येक वेळी केंद्र सरकारवर बोट दाखवत आहे. तुम्ही काय फक्त खुर्च्या गरम करायला सत्तेत बसला आहात का, असा सवाल करत पाटील यांनी राज्य सरकारवर टीका केली ( Chandrakant Patil On Mahavikas government ) आहे.
पुण्यात माध्यमांना बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, "राज्याला केंद्र सरकारने काहीही दिलं तरी तुम्ही प्रत्येकवेळी केंद्राकडे बोट दाखवता. केंद्र सरकारने दरवेळेस राज्याला मदत दिली. मात्र, राज्य सरकार काय करत आहे हेच समजत नाही. तुम्ही काय फक्त खुर्च्या गरम करायला सत्तेत बसला आहात का," असा सवाल त्यांनी विचारला आहे.
'मुख्यमंत्री बाहेर पडले यात आनंदच'