Chandrakant Patil : 'परखडपणाने समाज चालत नाही', चंद्रकांत पाटलांची अजित पवार यांच्यावर टीका - चंद्रकांत पाटील लेटेस्ट न्यूज
यंदाचं हिवाळी अधिवेशन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरऐवजी मुंबईत होत आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्ष यांच्यामध्ये सुरू असलेल्या सुंदोपसुंदीवरून अधिवेशनात दोन्ही बाजूंनी खडाजंगी पाहायला मिळत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण कोणतेही सरकार करू शकत नाही, असे स्पष्टपणे सांगितले. त्यावर आज भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अजित पवार यांच्यावर ( Chandrakant Patil criticized Ajit Pawar ) टीका केली.
पुणे - माझ्या एसटी कर्मचाऱ्यांनो सरकारमध्ये विलीनीकरण होईल, हा मुद्दा डोक्यातून काढून टाका. सर्वच महामंडळांच्या कर्मचाऱ्यांनी असा हट्ट धरला, तर तो पूर्ण करणे कोणत्याही सरकारला शक्य होणार नाही, असे उपमुख्यमंत्री अजित पवार ( Ajit Pawar On ST Strike ) यांनी विधानसभेत स्पष्ट केल्यानंतर आज भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ( Chandrakant Patil criticized Ajit Pawar ) आपलं मत व्यक्त केलं आहे. अजित दादांना नेहेमीच असं वाटतं की त्यांच्या परखडपणा किती मोठा आहे. अशा परखडपणाने समाज चालत नाही. तीच गोष्ट नीट सांगायची असते. तुम्हाला जर असं वाटतंय की विलीनीकरण शक्य नाही तर का नाही. तुम्ही जर जीवन प्राधिकरणाच विलीनीकरण करू शकता, तर मग एसटीच का नाही? तुम्हाला अडचण काय आहे. राज्याची तिजोरी आहे कशासाठी, असा सवाल देखील यावेळी पाटील यांनी केला.