पुणे -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे कधी नव्हे ते बाहेर पडले आहेत. उद्धव ठाकरे हे आपण हवाई पाहणी नाही तर जमिनीवरून दौरा केला असे सांगत आहेत. मुख्यमंत्र्यांचे पाय जमिनीवर आले याबद्दल त्यांचे अभिनंदन आणि शुभेच्छा. सरकार आल्यापासून उद्धव ठाकरे यांचे पाय जमिनीपासून वर गेले होते ते जमिनीवर आहेत याचा आनंद आहे, अशी खोचक टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली. ते पुण्यात बोलत होते.
'उद्धव ठाकरे दीड वर्षाने घराबाहेर पडले याचा आनंद.. त्यांचे पाय जमिनीवर आले' - चंद्रकांत पाटील
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे कधी नव्हे ते बाहेर पडले आहेत. उद्धव ठाकरे हे आपण हवाई पाहणी नाही तर जमिनीवरून दौरा केला असे सांगत आहेत. मुख्यमंत्र्यांचे पाय जमिनीवर आले याबद्दल त्यांचे अभिनंदन आणि शुभेच्छा. सरकार आल्यापासून उद्धव ठाकरे यांचे पाय जमिनीपासून वर गेले होते ते जमिनीवर आहेत याचा आनंद आहे, अशी खोचक टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.
!['उद्धव ठाकरे दीड वर्षाने घराबाहेर पडले याचा आनंद.. त्यांचे पाय जमिनीवर आले' chandrakant patil cirtcism udhhav thakeray](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-11844654-874-11844654-1621595072865.jpg)
पुण्यात पाटील यांच्या हस्ते लोककलावंतांना शिधा वाटप करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. पाटील म्हणाले, देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर हे दोघे सभागृहातील विरोधी पक्षनेते आहेत. त्यामुळे त्यांनी कोकणात नुकसानग्रस्त भागाचा दौरा करून आढावा घेतला. दोघांनी जमिनीवरून प्रवास केला, हवाई पाहणी केली नाही. पंतप्रधान हे असे पद आहे यांच्याबाबत धोका पत्करणे अवघड असते. त्यांची सुरक्षा महत्वाची आहे. अधिकाधिक पाहणी करण्यासाठी पंतप्रधानाना हवाई पाहणी करण्यास सुचवले जात असते, अशी परंपरा आहे. इंदिरा गांधीही असेच करत होत्या. टीकाटिप्पणी करताना काही तरी इतिहासाचे ज्ञान पाहिजे अशी टीका पाटील यांनी केली.
पंतप्रधानांनी महाराष्ट्राबाबत कुठलाही दुजाभाव केलेला नाही, उगाच वावड्या आणि चर्चा केल्या जातात. महाराष्ट्र्त हवाई पाहणी करण्यासाठी अनुकूल वातावरण नसल्याचे हवामान विभागाने सांगितल्याने पंतप्रधान महाराष्ट्रात आले नाहीत. त्यांनी गुजरातची पाहणी केली असे पाटील यांनी यावेळी सांगितले. पंतप्रधानांनी फक्त गुजरातसाठी नाही तर सर्वांसाठी 2 लाख रुपयांची घोषणा केली आहे. महाराष्ट्र सरकारला पंचनामे अहवाल लवकर सादर करा मी मदत देईल, असे पंतप्रधानांनी सांगितले असे पाटील म्हणाले