महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Aug 2, 2022, 9:38 AM IST

ETV Bharat / city

Chandrakant Patil : शरद पवारांच्या पुरंदरेंवरील टीकेला चंद्रकांत पाटलांचे खोचक प्रत्युत्तर, म्हणाले...

Chandrakant Patil : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी पुण्यात एका कार्यक्रमात बाबासाहेब पुरंदरे यांच भाषण आणि त्यांच्या लिखानएवढा अन्याय शिवछत्रपतींवर दुसरा कोणी देखील केला नाही, अशी टिका केली होती. यावर स्वतःला प्रोजेक्शन मिळवण्यासाठी आपण दुसऱ्यावर टीका करून लोकांना विचलित करण्यापेक्षा तुम्हीच पर्याय द्या, असे प्रतिउत्तर चंद्रकांत पाटलांनी दिले आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील

पुणे - बाबासाहेब पुरंदरे यांच भाषण आणि त्यांच्या लिखानएवढा अन्याय शिवछत्रपतींवर दुसरा कोणी देखील केला नाही, अशी टिका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी पुण्यात एका कार्यक्रमात केले होते. त्याला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे. पाटील म्हणाले की स्वतःला प्रोजेक्शन मिळवण्यासाठी आपण दुसऱ्यावर टीका करून लोकांना विचलित करण्यापेक्षा तुम्हीच पर्याय द्या, असा खोचक टोला यावेळी चंद्रकांत पाटील यांनी पवारांना लगावला आहे.

चंद्रकांत पाटलांचे प्रतिउत्तर -पुण्यातील बालगंधर्व येथे महाराष्ट्र कीर्ति सौरभ प्रतिष्ठान पुणे आयोजित शिवशाहीर श्री बाबासाहेब पुरंदरे पुरस्कार भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते देण्यात आला आहे. यावेळी यंदाचा शिवशाहीर श्री बाबासाहेब पुरंदरे पुरस्कार डॉ. गो. बं. देगलूरकर यांना देण्यात आला आहे. यावेळी चंद्रकांत पाटील बोलत होते. मला आज व्यासपीठावरून जे मांडायचा होत ते देगलूरकर यांनी मांडला आहे. स्वतःला प्रोजेक्शन मिळवण्यासाठी आपण दुसऱ्यावर टीका करून ज्या व्यक्तिमत्वाचा समाजाला उपयोग होणार आहे. त्या व्यक्तिमत्वाने जे संशोधन केले ते संशोधन लोकांना उपयोगी पडणार आहे. त्याच्यापासून लोकांना विचलित करतात. तुम्हीच पर्याय द्या जे आहे. ते नष्ट करायचं असेल तर त्याच्यापेक्षा प्रभावी तुम्ही पर्याय द्या, की जो लोकांना पटला पाहिजे. लोकांना ते तुम्ही फुकट वाटा पण तुम्ही जे लिहिलेलं आहे, ते खरं असणार त्याच्यामध्ये काही दम असेल तर लोक वाचतील असे यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील

शरद पवारांनी मत मांडले होते -पुण्यात अण्णाभाऊ साठे सभागृहात इतिहास अभ्यासक श्रीमंत कोकाटे लिखित शिवचरित्र आणि विचारप्रवाह या ग्रंथाचे प्रकाशन झाले आहे. या कार्यक्रमात पवार म्हणाले होते की, माझ्यामते शिवछत्रपतींवर इतका अन्याय कोणी केला नाही. जितका शिवचरित्राच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेल्या बाबासाहेबांच्या लिखाणातून छत्रपती शिवजी महाराजांवर सर्वाधिक अन्याय झाला, असे शरद पवारांनी मत मांडले होते. त्याला आज चंद्रकांत पाटील यांनी हलक्या भाषेत प्रतिउत्तर दिले आहे.

हेही वाचा -Al Qaeda leader death : सीआयएच्या ड्रोन हल्ल्यात अलकायदाचा दहशतवादी अल-जवाहरी अफगाणिस्तानात ठार

हेही वाचा -Mumbai University : 'विद्यार्थी संघटना शाहू महाराजांचे नाव देण्यावर ठाम', कुलगुरूंनी घेतली भेट

ABOUT THE AUTHOR

...view details