पुणे -2 वर्षांत महाविकास आघाडी सरकारचा ( Mahavikas Aghadi Government ) कारभार हा भ्रष्टाचार, गोंधळ, अनागोंधी अशा पद्धतीने चालला आहे. गेल्या 2 वर्षात सरकारने घेतलेले निर्णय आणि त्यावर हायकोर्टाने त्यांना ठोकले आहे. एकही निर्णय या सरकारचा कोर्टात टिकलेला नाही. तरी देखील हे लोक बेमुरवतपणे सरकार चालवत आहे. एक समाजाचा घटक संतुष्ट आहे, असे दाखवले तर सरकारचे आपण अभिनंदन करू, ज्या ज्या वेळेला संधी मिळेल तेव्हा लोक हे सरकार फेकून देतील यात माझ्या मनात तिळमात्र शंका नाही. शिवाय दोन वर्षात महाविकास आघाडी सरकारने फक्त पैसे कमवण्याचे काम केले, अशी टीका भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील ( BJP State President Chandrakant Patil ) यांनी केली आहे. ते पुण्यात बोलत होते.
राज्यातील एकूण मंत्रिमंडळातील एक चतुर्थांश मंत्री हे कुठल्याना कुठल्या आरोपाखाली चौकशीच्या फेऱ्यात आहे. दोन मंत्र्यांचा राजीनामा हा झालेला आहे. बाकीचे मंत्री हे नैतिकता म्हणून राजीनामा द्यायला पाहिजे ते देत नाही. कोणावर महिलांशी संबंध ठेवल्याच आरोप आहे. अशा पद्धतीने या सरकारचे खुल्या पद्धतीने मोघलाई सुरू आहे. आज 23 दिवस सतत सुरू असलेल्या एसटी संपात लक्ष न घातलेले हे सरकार आहे. आरक्षणाच्या बाबतीत देखील मराठा समाजाच्या ( Maratha Reservation Issue ) तोंडाला पाणी पुसण्याचे काम या सरकारने केले आहे, असे पाटील म्हणाले.