पुणे - राज्यात सत्ताधारी आणि विरोधकात चांगलेच कलगीतुरे रंगताना पहायला मिळत आहेत. एकाने आरोप केले की लगेच प्रतिउत्तर मिळताना दसत आहे. दरम्यान, सांगली येथे झालेल्या कार्यक्रमात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर एकेरी भाषेत टीका केली. मात्र, या वक्तव्याचा निषेध करत पुण्यातील संदीप काळे या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याने चंद्रकांत पाटील यांना जरा डोकं शांत ठेऊन टिका करा, असा सल्ला देत थेट नवरत्न तेल भेट दिले आहे.
चंद्रकांत दादा डोकं शांत ठेवून टिका करा, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याने पाठवले नवरत्न तेल - etv bharat marathi
सांगली येथे झालेल्या कार्यक्रमात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर एकेरी भाषेत टीका केली. त्यानंतर, या वक्तव्याचा निषेध करत पुण्यातील संदीप काळे या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याने चंद्रकांत पाटील यांना जरा डोकं शांत ठेऊन टिका करा, असा सल्ला देत थेट नवरत्न तेल भेट दिले आहे.
चंद्रकांत दादांच्या फोटोसह नवरत्न तेल बॉटल
आपण कुणाबद्दल बोलतो, आपली तेवढी उंची आहे का? बोलताना जरा डोकं शांत ठेवून टिका करावी. म्हणून हे नवरत्न तेल चंद्रकांत पाटील यांना डोकं शांत करण्यासाठी पाठवत आहे अशी प्रतिक्रिया काळे यांनी दिली आहे. दरम्यान, नवरत्न तेलानेही तुमचं डोकं शांत नाही झालं तर, त्याच्यावरी दुसरा इलाज मी स्व:च्या खर्चांने करतो असही काळे टीका करताना म्हणाले आहेत.
हेही वाचा -सामना 'रोखठोक' : सत्य बोलणाऱ्यांवर तपास यंत्रणांचा ससेमिरा लावायचा हीच नवी लोकशाही आणि स्वातंत्र्य!