पुणे- केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरच्या पुनर्वसनाचा प्रश्न अधिक संवेदनशीलतेने आणि प्रभावीपणे हाताळण्याची गरज आहे, असे मत शरद संस्थेचे अध्यक्ष आणि काश्मीर प्रश्नांचे अभ्यासक संजय नहार यांनी व्यक्त केले आहे. सोमवारी मोदी सरकारने कलम 370 हटवण्याचा घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयासंबंधी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे.
केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरच्या पुनर्रचनेचा प्रश्न अधिक प्रभावीपणे हाताळण्याची गरज- संजय नहार - modi
सरकारने जम्मू-काश्मीरमधील परिस्थिती प्रभावीपणे हाताळण्याची गरज आहे. अन्यथा अफगाणिस्तानमधील दहशतवादी गट काश्मीरमध्ये सक्रिय होण्याची शक्यता असल्याचे संजय नहार यांनी यावेळी सांगितले.
![केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरच्या पुनर्रचनेचा प्रश्न अधिक प्रभावीपणे हाताळण्याची गरज- संजय नहार](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-4053337-thumbnail-3x2-pu.jpg)
कलम 370 निरस्त केल्यामुळे काश्मीरमध्ये उठाव होण्याची शक्यता कमी आहे. घटनादुरुस्तीच्या पार्श्वभूमीवर सरकारने काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणावर फौजफाटा तैनात केला आहे. कारगील, लेह आणि जम्मूच्या काही भागांमध्ये अशा प्रकारची मागणी पूर्वीपासून होती. मात्र, काश्मीर मधील काही ठिकाणी या निर्णयामुळे प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे नहार यांनी म्हटले आहे.
घटना दुरुस्तीचे दूरगामी परिणाम काय होतील हे आता सांगता येणे कठीण आहे. मात्र, सरकारने जम्मू-काश्मीरमधील परिस्थिती प्रभावीपणे हाताळण्याची गरज आहे. अन्यथा अफगाणिस्तानमधील दहशतवादी गट काश्मीर मध्ये सक्रिय होण्याची शक्यता असल्याचेही संजय नहार यांनी यावेळी सांगितले.