पुणे - देशभरात महाशिवरात्री उत्साहात साजरी केली जाते. महाशिवरात्री निमित्ताने दरवर्षी देशभरातील शिव मंदिरात भाविकांची मोठी गर्दी होत असते. यंदा मात्र कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात शिव मंदिरांमध्ये भाविकांना येण्यास मज्जाव करण्यात आला आहे. त्यामुळे काही मोजक्या लोकांच्या उपस्थितीत शिव मंदिरात महाशिवरात्री साजरी केली जात आहे. पुण्यात देखील महाशिवरात्र उत्साहात साजरी केली जात आहे. मात्र, भाविकांना या ठिकाणी यायला परवानगी दिली नाही. पुण्यातील वासुदेव निवास येथे देखील दरवर्षी महाशिवरात्र साजरी केली जात असते. यंदाही पुण्यातील वासुदेव निवासमध्ये महाशिवरात्री निमित्ताने चातुर्याम पूजा केली जाते.
हेही वाचा -ईटीव्ही भारत विशेष : महाशिवरात्रीला कोंबड्याची पूजा करणारे कोल्हापुरातले अनोखे गाव