पुणे- राज्यातील मंदिरे पाडव्याच्या मुहूर्तावर खुली करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला. त्यानंतर सोमवारी पहाटेपासूनच राज्यभरात ठिकठिकाणी मंदिरांमध्ये भाविकांनी गर्दी केल्याचे चित्र पाहायला मिळालं. पुणे शहरातदेखील मंदिरांमध्ये भाविकांनी पहाटेपासूनच गर्दी केल्याचे चित्र पाहायला मिळाले आहे. पाडव्याच्या मुहूर्तावर मंदिर खुली होत असताना मंदिराबाहेर फटाके, वाजंत्री वाजवत, महाआरती करत मंदिर खुले होण्याचा आनंद व्यक्त करण्यात आला. पुण्यातल्या ग्रामदैवत कसबा गणपती मंदिरात ब्राह्मण महासंघाच्या वतीने महाआरती करण्यात आली.
हेही वाचा - दिलासादायक..! मुंबईतील चार विभागातील रुग्ण दुपटीचा दर 400 दिवसांच्या पार