पुणे - येस बँक आणि डीएचएफएल गैरव्यवहार प्रकरणात अटकेत असलेले पुण्यातील उद्योगपती अविनाश भोसले (Avinash Bhosale Helicopter) यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. शनिवारी अविनाश भोसले यांचे हेलिकॉप्टरही सीबीआयकडून जप्त करण्यात आले आहे. ऑगस्टा वेस्टलँड कंपनीचे असलेले हेलिकॉप्टर सीबीआयकडून जप्त करण्यात आले आहे.
Avinash Bhosale : बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांचे हेलिकॉप्टर सीबीआयकडून जप्त - builder Avinash Bhosale
येस बँक आणि डीएचएफएल गैरव्यवहार प्रकरणात अटकेत असलेले पुण्यातील उद्योगपती अविनाश भोसले (Avinash Bhosale Helicopter) यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. शनिवारी अविनाश भोसले यांचे हेलिकॉप्टरही सीबीआयकडून जप्त करण्यात आले आहे.
युनियन बँक ऑफ इंडियाच्या नेतृत्वाखालील 17 बँकांच्या कन्सोर्टियमला 34,615 कोटी रुपयांचे नुकसान करणाऱ्या DHFL च्या घोटाळ्यात सहभाग असल्याचा आरोप अविनाश भोसले यांच्यावर आहे. ऑगस्टा वेस्टलँड कंपनीचे असलेले हेलिकॉप्टर सीबीआयकडून जप्त करण्यात आले आहे.
डीएचएफएल प्रकरणात तीनशे कोटींपेक्षा अधिक फसवणूक केल्याप्रकरणी पुण्यातील बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांना सीबीआयकडून अटक करण्यात आली होती. डीएचएफएल प्रकरणात त्यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला होता. त्यानंतर त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. गेल्या काही दिवसांमध्ये अविनाश भोसले यांच्या पुणे-मुंबई परिसरात सीबीआयने छापेमारी केली होती.
TAGGED:
builder Avinash Bhosale