पुणे: पुण्यात 'सेक्स तंत्र मंत्र' शिबीराची Sex Tantra Mantra camp advertise organization सोशल मीडियावर अश्लील जाहिरात करणार्या सत्यम शिवम सुंदरम फाऊंडेशनवर Satyam Shivam Sundaram Foundation पुणे शहरांतील सामाजिक सुरक्षा विभागाने गुन्हा दाखल केला आहे. सत्यम शिवम सुंदरम ही उत्तर प्रदेशातील संस्था असून या संस्थेचा संचालक रवि प्रकाश सिंग (रा. प्रयागराज, उत्तर प्रदेश) case filed against Ravi Prakash Singh असे गुन्हा दाखल केलेल्याचे नाव आहे.
Sex Tantra Mantra camp Pune : 'सेक्स तंत्र मंत्र’ शिबिराची सोशल मीडियावर अश्लील जाहिरात करणार्या संस्थेवर पुण्यात गुन्हा दाखल - सेक्स तंत्र मंत्र शिबिराची अश्लील जाहिरात
पुण्यात 'सेक्स तंत्र मंत्र' शिबीराची Sex Tantra Mantra camp advertise organization सोशल मीडियावर अश्लील जाहिरात करणार्या सत्यम शिवम सुंदरम फाऊंडेशनवर Satyam Shivam Sundaram Foundation पुणे शहरांतील सामाजिक सुरक्षा विभागाने गुन्हा दाखल केला आहे. सत्यम शिवम सुंदरम ही उत्तर प्रदेशातील संस्था असून या संस्थेचा संचालक रवि प्रकाश सिंग (रा. प्रयागराज, उत्तर प्रदेश) case filed against Ravi Prakash Singh असे गुन्हा दाखल केलेल्याचे नाव आहे.
जाहिरात सोशल मीडियावर व्हायरल केली -सेक्स तंत्र सत्यम शिवम सुदंरम फाऊंडेशनच्या माध्यमातून नवरात्र उत्सवात १ ते ३ ऑक्टोंबर रोजी सेक्स तंत्र शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या बाबतची जाहिरात सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर अनेक संस्था संघटनानी तीव्र विरोध दर्शविला आणि त्यांनतर पुणे पोलिसांनी तो कार्यक्रम रद्द करून आयोजकांवर गुन्हा दखल केला आहे.
विवादित जाहिरातीमुळे सामाजिक संघटना संतापल्या -या शिबिरात वैदिक सेक्स तंत्रासह चक्र अॅक्टिव्हेशन, ओशो मेडिएशन या सारख्या विविध गोष्टी शिकविल्या जाणार असल्याचे त्यात नमूद करण्यात आले होते. या जाहिरात व्हाटसअॅपवर प्रसारित झाल्याने पुणे शहर पोलीस वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सामाजिक सुरक्षा विभागाला चौकशीचे आदेश दिले होते. या जाहिरातीत दिलेल्या मोबाईलवर पोलीसांना संपर्क साधला असता त्याने रवि प्रकाश सिंग असे आपले नाव सांगितले. सत्यम शिवम सुंदरम फाऊंडेशन ही उत्तर प्रदेशात रजिस्टर केलेली संस्था असल्याचे सांगितले. तसेच सोशल मीडियावर प्रसारित केलेली जाहिरात आपण केल्याचे मान्य केले. त्यानंतर सामाजिक सुरक्षा विभागाच्या महिला पोलीस अंमलदार मनिषा पुकाळे यांनी सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलीस अधिकारी अधिक तपास करीत आहेत.