महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Pune Rape Case : पुण्यात बांधकाम व्यावसियाकडून महिलेवर बलात्कार; गुन्हा दाखल - builder rape in Pune

पुण्यात एका महिलेवर व्यावसायिकाने लग्नाचे आमिष दाखवून वारंवार बलात्कार केला ( Builder Rape Case In Pune ) आहे. याप्रकरणी महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार व्यावसायिकावर गुन्हा दाखल करण्यात आला ( Deccan Police Register Fir Rape ) आहे.

Pune Rape Case
Pune Rape Case

By

Published : Feb 16, 2022, 12:00 PM IST

पुणे - राज्यात महिलांवर अत्याचाराचे प्रमाण वाढले आहे. त्यातच आता पुण्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाने लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर वारंवार बलात्कार केला ( Builder Rape Case In Pune ) आहे. याप्रकरणी बांधकाम व्यावसायिकावर गुन्हा दाखल करण्यात आला ( Deccan Police Register Fir Rape ) आहे.

भारत देसडला असे त्या बांधकाम व्यावसायिकाचे नाव ( Bharat Desdala Against Rape Case ) आहे. एका महिलेने लग्नाचे आमिष दाखवून वारंवार बलात्कार केल्याचा आरोप भारत देसडला यांच्यावर केला आहे. याप्रकरणी डेक्कन पोलीस ठाण्यात मंगळवारी ( 15 फेब्रुवारी ) गुन्हा दाखल केला आहे.

भारत देसडला हे घुमान येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्वागत अध्यक्ष होते. देसडला यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्याने साहित्य क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, देसडलांवर गुन्हा दाखल झाल्याने पोलिसांच्या कारवाईकडे लक्ष लागले आहे.

हेही वाचा -Kirit Somaiya Vs Sanjay Raut : किरीट सोमैयांची पत्रकार परिषद! राऊतांसह ठाकरे कुटुंबावर केले आरोप

ABOUT THE AUTHOR

...view details