पुणे- वडगावशेरी येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी आमदार कुटुंबावर सुनेचा मानसिक छळ, पतीने अनैसर्गिक अत्याचार आणि दीराने लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुण्यात राष्ट्रवादीच्या माजी आमदारासह कुटुंबावर सुनेचा छळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल - अनैसर्गिक अत्याचार
दीराने लैंगिक अत्याचार केल्यानंतर शरीर संबंधाबाबत कोणाला काही सांगितल्यास कुठे गायब करेल कळणार नाही, अशी धमकी दिली होती.
![पुण्यात राष्ट्रवादीच्या माजी आमदारासह कुटुंबावर सुनेचा छळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/images/768-512-2955974-thumbnail-3x2-punemla.jpg)
वडगावशेरी येथील माजी आमदार, पीडित महिलेचा पती, सासू, दीर, नंनद आणि आणखी २ व्यक्तींनी २००८ ते फेब्रुवारी २०१९ या कालावधीत वरील सर्वांनी सुनेचा मानसिक आणि शारीरिक छळ केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
तर, दीराने लैंगिक अत्याचार केल्यानंतर शरीर संबंधाबाबत कोणाला काही सांगितल्यास कुठे गायब करेल कळणार नाही, अशी धमकी दिली होती. तर पतीनेदेखील अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केला, असे पीडित महिलेने सांगितले. तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास चालू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.