महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री अन् शरद पवार यांची सोशल मीडियावर बदनामी केल्याप्रकरणी 13 जणांवर गुन्हे दाखल - अजित पवार बातमी

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपमुख्यमंत्री अजित पवार व राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची सोशल मीडियावर बदनामी केल्या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात 13 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

By

Published : May 6, 2021, 4:54 PM IST

पुणे -राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपमुख्यमंत्री अजित पवार व राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची सोशल मीडियावर बदनामी केल्या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात 13 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

नाना पंडित, वैभव पाटील, महेश गहुडले, धनंजय जोशी, सोनाली राणे, जयसिंग मोहन, संदीप पाटील शौर्यन श्रीकृष्ण चोरगे, अतुल अयाचित, राजेंद्र पवार, राज पाटील, मुकेश जाधव, स्वरूप भोसले अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. या सर्वांवर 469, 499, 500, 504, 505 (2), 34 सह माहिती तंत्रज्ञान कायदा 67 नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.या प्रकरणी आणि आकाश चंद्रकांत शिंदे (वय 24 वर्षे) यांनी तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वरील आरोपींनी फेसबूक, व्हाट्सअ‌ॅप, ट्विटरच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या राजकीय व्यक्तिमत्त्वाच्या लौकिकास बाधा आणण्यासाठी त्यांचे फोटोमॉर्फ करून तसेच घाणेरड्या व अश्लील पोस्ट सोशल मीडियावर प्रसारित केल्या होत्या. तसेच सोशल मीडियावरील विविध ग्रुपच्या माध्यमातून त्यांनी ब्राह्मण व ब्राह्मणेतर जातीमध्ये तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट केल्या आहेत.

फेसबुकवरील ग्रुप 'राजकारण महाराष्ट्राचे', कोमट बॉईज अँड गर्ल्स फेसबूक ग्रुप व्हाट्सअ‌ॅप ग्रुप व ट्विटर या समाज माध्यमांवर आरोपींनी बदनामीकारक मजकूर प्रसारित केला होता. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस निरीक्षक डी.एस.हाके करत आहेत.

हेही वाचा -कौतुकास्पद; घरातील दागिने गहाण ठेवून तरुणाने उभारले कोविड हॉस्पिटल

ABOUT THE AUTHOR

...view details